साजरा झाला 'सुरक्षित अंतरा'तला ह्रद्य सोहळा

टीम ई सकाळ
शुक्रवार, 16 जून 2017

लग्नाचा वाढदिवस असला की नवरा बायकोत फिरायला जायचे बेत बनतात. काहीजण सिनेमाला जातात. माॅलमध्ये किंवा हाॅटेलात ही अॅनिव्हरर्सरी साजरी करणे आता नवे राहीले नाही. पण नाटकावर मनापासून प्रेम करणारा नाट्यप्रेमी आजही असे सोहळे साजरे करतो ते रंगदेवतेच्या साक्षीने. असाच एक किस्सा घडला तो नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात. 

नाशिक : लग्नाचा वाढदिवस असला की नवरा बायकोत फिरायला जायचे बेत बनतात. काहीजण सिनेमाला जातात. माॅलमध्ये किंवा हाॅटेलात ही अॅनिव्हरर्सरी साजरी करणे आता नवे राहीले नाही. पण नाटकावर मनापासून प्रेम करणारा नाट्यप्रेमी आजही असे सोहळे साजरे करतो ते रंगदेवतेच्या साक्षीने. असाच एक किस्सा घडला तो नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात. 

दोन दिवसांपूर्वी कालिदास नाट्यगृहात सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाचा प्रयोग होता. नाटकाला प्रतिसादही तुफान होता. नाटक सुऱळीत सुरु होते. नेमानुसार मध्यांतर झाले. कलाकार चहासाठी रंगभूषा कक्षात गेले. तर इक़डे प्रेक्षागृहात वेगळेच नाट्य रसिकांना पाहायला मिळाले. लव्ह मॅरेज, अॅरेंज मॅरेज यावर हे नाटक बोलते. तर असा हा विषय साक्षीला ठेवून एका वयस्कर अशा दोन दाम्पत्यांनी आपला लग्नाचा वाढदिवस साजरा केला. पहिल्या दाम्पत्याचे नाव होते आदवतकर आणि ़दुसरे होते उपळीकर. एकाने लग्नाचा 40 वा वाढदिवस साजरा केला. तर दुसर्यांंचा वाढदिन होता तो 28 वा वर्षांचा. सर्व नाट्य रसिकांना साक्षीला ठेवून या जोडप्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिन साजरा केला. 

या ह्रद्य कार्यक्रमाबद्दल बोलताना अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला, मध्यंतरात असे काही घडते आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. नाटक झाल्यानंतर आम्हाला हा प्रकार समजला. थिएटरमध्ये एकमेकांना हार घालून त्यांनी हा वाढदिवस साजरा केला. मला याचे फार कौतुक वाटले. आमचे नाटक विवाह या विषयावर बोलते. आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी हे नाटक निवडणे ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. अभिनेता निखिल राऊत यानेही या घटनेबद्दल समाधान व्यक्त केले.