वारसमधून स्वप्नील जोशी व सचिन पिळगांवकर आमने-सामने

टीम इ सकाळ
बुधवार, 28 जून 2017

स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांचे नाते मानस पितापुत्रांचे आहे हे सर्व जाणतात. यापूर्वी आम्ही सातपुते या चित्रपटाद्वारे हे दोघे एका पडद्यावर आले होते. आता आगामी वारस या चित्रपटातून हे दोघे पुन्हा झळकत आहेत. विशेष म्हणजे, यात स्वप्नील नायकाच्या भूमिकेत असून खलनायकाच्या भूमिकेत सचिन पिळगांवकर आहेत. 

पुणे: स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांचे नाते मानस पितापुत्रांचे आहे हे सर्व जाणतात. यापूर्वी आम्ही सातपुते या चित्रपटाद्वारे हे दोघे एका पडद्यावर आले होते. आता आगामी वारस या चित्रपटातून हे दोघे पुन्हा झळकत आहेत. विशेष म्हणजे, यात स्वप्नील नायकाच्या भूमिकेत असून खलनायकाच्या भूमिकेत सचिन पिळगांवकर आहेत. 

या सिनेमाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक राकेश सारंग करत असून, बर्याच काळानंतर ते पुन्हा चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळले आहेत. यात सचिन यांचा लूकही वेगळा असणार आहे. सिनेमाची गोष्ट सागण्यास सिनेमाच्या टिमने नकार दिला असला तरी या दोन मानस पितापुत्रांची आगळी जुगलबंदी रसिकांना या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.