स्वप्नील आणि सोनाली ही जोडी पुन्हा एकत्र येणार

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

बॉलीवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमेंटिक कपल असणारे राहुल-अंजली हे पात्र लवकरच मराठीत येत आहे. 'तुला कळणार नाही' या आगामी सिनेमातून त्यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे.

मुंबई : बॉलीवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमेंटिक कपल असणारे राहुल-अंजली हे पात्र लवकरच मराठीत येत आहे. 'तुला कळणार नाही' या आगामी सिनेमातून त्यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे.

सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीत रोमेंटिक चित्रपटांचा नवा पायंडा घालणारी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून,  श्रेया कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार ह्या तिकडीने देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

मराठीतील या राहुल अंजलीच्या भूमिकेत कोण आहे, हे सध्या गुपितच ठेवण्यात आले असले तरी, सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच लॉंच झालेल्या 'तुला कळणार नाही' या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये त्यांचा आवाज ऐकू येतो. तो आवाज सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी यांचा आहे.