लग्नाआधीची गोड आठवण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

बॉलीवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतात.

ते बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असतात. मग, ते त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल असतील किंवा इतर खासगी बाबींबद्दल. या वेळेस त्यांनी एक मजेशीर आठवण शेअर केली आहे आणि तीही जया बच्चन यांच्यासोबतची.

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा आणि जया बच्चन यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात जया बच्चन त्यांना घास भरवत आहेत. तसेच त्यांनी या फोटोसोबत जे लिहिले तेही खूपच मजेशीर आहे. त्यांनी लिहिले की, जंजीर चित्रपटाच्या चित्रीकरणातील एक दृश्‍य. तेव्हा आमचे लग्नही झाले नव्हते.

एखाद्या माणसाचे मन जिंकायचे असेल तर त्याला खूप चांगले चुंगले खायला द्यावे लागते, हे लग्नाआधीच कळले होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 3 जूनला 44 वर्षे पूर्ण झालीत. त्यांच्या चाहत्यांना त्यांची ही गोड आठवण फारच आवडलीय.