तैमूर दोघांसारखा दिसतो - करिना कपूर

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

तैमूरबाबत आम्ही दोघेही खूप उत्साही आहोत. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्याचे उत्तम संगोपन करण्याची जबाबादारी आमच्यावर आहे. 

मुंबई - माझ्या आयुष्यातील आनंददायी क्षणांना सुरवात झाली असून, सैफ आणि मी नव्याने अनुभव घेत आहोत. तैमूर हा आमच्या दोघांसारखाच दिसतो, असे करिना कपूरने म्हटले आहे.

करिना कपूरने नुकताच मुलाला जन्म दिला होता. या मुलाचे नामकरण तैमूर असे करण्यात आले आहे. सैफ अली खान व करिना कपूरने मुलासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. करिना लॅक्मे फॅशन वीकमध्येही सहभागी झाली होती. करिनाने पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून, वीर दी वेडींग या चित्रपटात ती काम करत आहे.

करिना म्हणाली, की तैमूरबाबत आम्ही दोघेही खूप उत्साही आहोत. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्याचे उत्तम संगोपन करण्याची जबाबादारी आमच्यावर आहे.