तेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई, अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मेला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून बऱ्याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम करत नव्हती. आपल्या फॅन्ससोबत 22 मेच्या रात्री वाढदिवसाची ब्रिंग इन पार्टी केल्यावर तेजस्विनीने 23 मेला आपला वाढदिवस आपल्या जवळच्या मित्र-मंडळींसोबत साजरा केला.

या वाढदिवसाच्या छोटेखानी पार्टीत अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता अंकुश चौधरी, फिल्ममेकर संजय जाधव, अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेत्री नम्रता आवटे, अभिनेत्री स्पृहा जोशी आल्या होत्या.

Tejaswini Pandit Birthday Bash

याविषयी तेजस्विनी म्हणते, “ही खरं तर माझ्या कुटूंबियांनी माझ्यासाठी ठेवलेली सरप्राइज बर्थडे पार्टी होती. ज्यात माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रण दिलं होतं. काही मित्र-मैत्रिण शुटिंग किंवा आपल्या व्यावसायिक व्यस्तेतेमुळे पोहोचू शकले नव्हते. आठवड्यातला मधला वार असल्याने अर्थातच सगळ्यांना पार्टीला येणं शक्य झालं नाही. पण जे मित्र-मैत्रिण पोहोचले. त्यामुळे माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला.”

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: tejaswini pandit celebrates her birthday with friends