मोदींनंतर थेट उपराष्ट्रपतींकडून काश्मीर फाईल्सचं कौतुक, 'दुर्देवानं...'

काश्मीर फाईल्सची चर्चा तीन आठवड्यानंतर देखील जोरदारपणे सुरु आहे.
venkaiah naidu
venkaiah naiduesakal

The Kashmir Files: काश्मीर फाईल्सची चर्चा तीन आठवड्यानंतर देखील जोरदारपणे सुरु आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटामध्ये काश्मीर (Bollywood Movies) पंडितांवर काश्मीरच्या खोऱ्यात झालेले अन्याय, अत्याचार (kashmiri pandits) त्यांचे विस्थापन या मुद्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आतापर्यत मोठ्या प्रमाणावर या चित्रपटावर टीकाही झाली आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावरुन काश्मीर फाईल्सवर टीकेची झोड उठवली होती. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काश्मीर फाईल्सबद्दल गौरवोद्गगार काढले होते. काश्मीर फाईल्सच्या टीमनं मोदींची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी आता मिशन गंगावर देखील अशाच प्रकारचा चित्रपट यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. मोदींनंतर उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू (VP Venkaiah Naidu ) यांनी देखील काश्मीर फाईल्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नायडू यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपटावरुन जे राजकारण केले जात आहे त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. यापूर्वी देखील देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील मान्यवर नेत्यांनी काश्मीर फाईल्सची दखल घेऊन त्यावर आपली भूमिका मांडली होती. आता थेट उपराष्ट्रपतींनी दिलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे की, दुर्देवानं आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीचं राजकारणं केलं जातं. ते चूकीचं आहे. विशेष म्हणजे ही प्रवृत्ती सतत वाढीस लागली आहे. नायडू यांचे म्हणणे आहे की, या चित्रपटामध्ये जे काही मांडण्यात आले आहे त्यामध्ये तथ्य आहे.

एका कार्यक्रमामध्ये बोलताना नायडू यांनी काश्मीर फाईल्सवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होताना दिसत आहे. विरोधी पक्षांनी काश्मीर फाईल्सवर जी टीका केली आहे त्यात फारसं तथ्य नाही. ते चूकीचे आहे. त्या चित्रपटाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक त्या चित्रपटामध्ये काहीही राजकीय नाही. मात्र त्याकडे तसे पाहिले जात आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे सकारात्मक कलाकृती म्हणून पाहणं गरजेचं आहे. सध्या प्रेक्षकांमध्ये काश्मीर फाईल्सबद्दल उत्साह आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे या चित्रपटावरुन जे राजकारण केले जात आहे ते चूकीचे आहे.

venkaiah naidu
Kashmir Files ला दुबईत 'ग्रीन' सिग्नल; एकही दृष्य न वगळता 'स्क्रिनिंग'

या चित्रपटाचा कोणता राजकीय दृष्टिकोन आहे का? यावरुनही नायडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटामध्ये अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. ज्यात तथ्य आहे. नायडू यांची प्रतिक्रिया अशावेळी समोर आली आहे ज्यावेळी भाजपकडून सातत्यानं चित्रपट आणि काश्मीरी पंडितांची बाजू घेतली आहे. त्यांचं कौतूकही केलं आहे. दुसरीकडे कॉग्रेस आणि आणखी काही पक्षांनी काश्मीरी पंडितांवर सडकून टीका केली आहे. या चित्रपटानं राजकीय, धार्मिक व्देष पसरवण्याचे काम केले आहे असे त्यात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर या चित्रपटाचं कौतूक केल्याप्रकरणी टीका केली होती. भाजप काश्मीर फाईल्सचं कौतूक करुन राजकारण करत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. गेल्या आठ वर्षांपासून केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. अशावेळी त्यांनी पंडितांसाठी काही का केलं नाही? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com