'हिरो' ते 'मुन्ना मायकल'.. एका पट्टीचा 'डोके'बाज प्रवास

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 मे 2017

हिरो सिनेमाने जॅकी दादाचे करिअर बदलले. पण आता या गोष्टीलाही अनेक वर्षे लोटली. आता मात्र पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ यांची आठवण रसिकांना होणार आहे. कारण त्याच हिरो सिनेमात त्यांनी वापरलेली डोक्‍याची पट्टी आता त्यांचा मुलगा टायगर वापरताना दिसणार आहे. आगामी मुन्ना मायकल या सिनेमात टायगर सिनेमाभर ही पट्टी डोक्‍याला बांधून मिरवताना दिसणार आहे.

मुंबई : हिरो सिनेमाने जॅकी दादाचे करिअर बदलले. पण आता या गोष्टीलाही अनेक वर्षे लोटली. आता मात्र पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ यांची आठवण रसिकांना होणार आहे. कारण त्याच हिरो सिनेमात त्यांनी वापरलेली डोक्‍याची पट्टी आता त्यांचा मुलगा टायगर वापरताना दिसणार आहे. आगामी मुन्ना मायकल या सिनेमात टायगर सिनेमाभर ही पट्टी डोक्‍याला बांधून मिरवताना दिसणार आहे.

या बाबांच्या पट्टीबाबत बोलताना टायगर म्हणाला, 'माझ्या सिनेमाचे दिग्दर्शक सब्बीर खान यांना माझा थोडा रॉ लूक हवा होता. आम्ही बर्याच टेस्ट केल्या पण हवा तसा लूक काही केल्या येईना. मग माझ्या बाबांनी ती पट्टी कपाटातून काढली आणि मला दिली. ती मी बांधली आणि आम्हाला हवा तसा लूक आला. आता सिनेमाभर आम्ही ती वापरली आहे. मी ती खूप जपली आहे.'