जॉनने केली टायगरची प्रशंसा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

जॉन अब्राहम आणि टायगर श्रॉफ दोघेही फिटनेसचे वेडे आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे दोघांचे एकमेकांशी पटले नाही तरच नवल! मध्यंतरी "गार्नियर' या ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी दोघे एकत्र आले होते. त्या वेळी या दोघांच्या गप्पा रंगल्या. त्यानंतर जॉन म्हणाला, "मी टायगरची जीवनपद्धती आणि चपळतेचा प्रशंसक आहे. त्याच्यासोबत एका जाहिरातीसाठी काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तो अतिशय मेहनती आणि उत्साही आहे. त्याच्याकडून मला अनेक गोष्टी समजल्या.'  