Pushpa स्टाईलमध्ये 'झोमॅटोचं' प्रमोशन, अल्लु अर्जुन 'फायर'

झोमॅटोचा अल्लु अर्जुनला प्रमोट करण्याचा निर्णय पडला महागात, नेटकरी संतापले
Allu Arjun Fired
Allu Arjun Fired

Pushpa Movie: स्टायलिश अल्लु अर्जुन (Tollywood Actor Allu Arjun) हा सध्या त्याच्या पुष्पा (Pushpa Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. महिन्यापूर्वी बॉक्स ऑफिसवर (Box Office Hit) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं कोट्यवधीची कमाई केली आहे. त्याच्यापुढे बॉलीवूडमधील (Bollywood News) अनेक चित्रपटांनी नांग्या टाकल्या आहेत. मात्र आता अल्लु अर्जुन हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या स्टाईलनं प्रसिद्ध कंपनी झोमॅटोचं प्रमोशन करणं नेटकऱ्यांना काही आवडलेलं नाही. त्या कंपनीच्या एका जाहिरातीत अल्लु पुष्पा स्टाईलमध्ये संबंधित कंपनीचे प्रमोशन करतो असं नेटकऱ्यांचा समज झाला आहे. त्यावरुन त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. Allu Arjun Trolled cause of Zomato Pramotion

भलेही पुष्पानं (Pushpa) प्रेक्षकांना जिंकून घेतलं असेल मात्र त्यांना अल्लुनं झोमॅटोच्या जाहिरातीमध्ये काम करणं आवडलेलं नाही. त्याच्या पुष्पास्टाईलमध्ये झोमॅटोचं प्रमोशन करण्यात आलं. त्याला काही नेटकऱ्यांचा जोरदार विरोध झाला तर अनेकांनी त्याचं कौतूकही केलं. झोमॅटोनं साऊथच्या चित्रपटाचा अपमान केला आहे. अशाप्रकारची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. झोमॅटोनं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये अल्लु अर्जुन एका व्हिलनला मारताना दिसतो आहे. अल्लु जेव्हा त्याला मारतो तेव्हा तो स्लो मोशनमध्ये पडताना दिसतो. तेव्हा तो व्हिलन बनी म्हणतो, तु मला लवकर खाली पाडू शकतोस का, त्यावर अल्लु अर्जुन त्याला म्हणतो, हा साऊथ सिनेमा आहे. आणि येथे असचं होतं.

Allu Arjun Fired
Viral Video: धोतरातल्या आबांचा 'उत्साह' विराटलाही लाजवणारा

यानंतर झोमॅटो आपल्या प्रमोशनसाठी काही लाईन्स पुढे करतं. साधारण अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. अनेकांनी अशाप्रकारे व्हिडिओ शेय़र करणे म्हणजे तो अभिनेता आणि त्या निर्मात्याचे नाव बदनाम केले जाते. गेल्या दीड महिन्यापासून पुष्पानं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे.

Allu Arjun Fired
Video: नांदेड-हैदराबाद महामार्गावर ट्रकने पादचाऱ्याला चिरडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com