पर्यटन, संस्कृतीला मिळणार प्रोत्साहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पणजी - ‘फिल्म बझार‘ हे व्यासपीठ एखाद्या फिल्मी सुपर मार्केटसारखे आहे. या ठिकाणी चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. या "फिल्म बझार‘मुळे भारतात अनेक नवे चित्रपट दिग्दर्शित होतील व त्याचा फायदा देशातील पर्यटन व संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यास होणार आहे, असे मत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी "फिल्म बझार‘च्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त केले.
 
या वेळी केंद्रीय मंत्री नायडू यांच्यासोबत व्यासपीठावर एनएफडीसीचे आर्थिक संचालक एन. जे. शेख, संचालक राजा छिन्नल उपस्थित होते. नायडू यांनी "फिल्म बझार‘मध्ये उभारण्यात आलेल्या दालनांची पाहणी केली. ते पुढे म्हणाले, की "एनएफडीसी‘ व "फिल्म बझार‘ने ज्या प्रकारे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते तसेच चित्रपट खरेदी करणाऱ्यांसाठी सोय व सुविधा उपलब्ध केल्या आहेत चित्रपट निर्मितीसाठी जे काही आवश्‍यक आहे ते येथे उपलब्ध आहे. 3-डी चित्रपट पाहण्याचाही या ठिकाणी अनुभवही घेण्याची सोय आहे.

चित्रपट हे खूप महत्त्वाचे कारण ते मनोरंजनाचे सर्वांत कमी खर्चाचे साधन आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून लोकांना काहीसा विरंगुळा व आनंद हवा असतो. चित्रपटसंस्कृती व वारसा याचे दर्शन घडवते. चित्रपट देशाचा संदेश अनेक ठिकाणी नेऊ शकतो. केंद्र सरकारने विविध देशांशी सहयोगासाठी चित्रपट सहनिर्मितीमध्ये करार केला असून यासाठी प्रोत्साहन केले जाईल, असे ते म्हणाले. या इफ्फी-2016 मध्ये दक्षिण कोरियन देशाच्या चित्रपटांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आल्याने नायडू यांनी त्या देशाच्या शिष्टमंडळाला भेटून सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर "फिल्म बझार‘मध्ये विविध राज्यांनी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी उभारलेल्या दालनांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली व माहिती घेतली. या वेळी "आझादी के 70 साल‘ या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे त्यांनी उद्‌घाटन केले.