आमीर खान पुरस्कार सोहळ्याला आल्याने चाहत्यांमध्ये आनंद

टीम ई सकाळ
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

आमीर पुरस्कार सोहळ्यांना कधी दिसणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम असे. पण आता मात्र त्याच्या तमाम चाहत्यांची ही इच्छा आमीरने पूर्ण केली आहे. हा कोणता दुसरा तिसरा सोहळा नसून, त्याच्या आगामी सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटातील पुरस्कार सोहळ्यात तो दिसला आहे. 

मुंबई : अभिनेता आमीर खानने एकदा एक गोष्ट ठरवली की तो ती नीट फाॅलो करतो. म्हणजे, वर्षाला एक सिनेमा करायचा ठरला की तो तेच करतो. तसाच त्याने आणखी एक निर्णय घेतला होता तो कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती न लावण्याचा. त्यानंतर ते त्याने कसोशीने पाळले. आमीर पुरस्कार सोहळ्यांना कधी दिसणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम असे. पण आता मात्र त्याच्या तमाम चाहत्यांची ही इच्छा आमीरने पूर्ण केली आहे. हा कोणता दुसरा तिसरा सोहळा नसून, त्याच्या आगामी सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटातील पुरस्कार सोहळ्यात तो दिसला आहे. 

सिक्रेट सुपरस्टारचा ट्रेलर 2 आॅगस्टला रिलीज झाला आहे. या ट्रेलरवर लोकांच्या उड्या पडल्या. दोन दिवसांत या ट्रेलरला दोन लाखांवर हिट्स मिळाले आहेत. या ट्रेलरमध्ये आमीर खान एका गाण्याच्या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर आमीरच्या चाहत्यांनी आपली ही इच्छा पूर्ण झाल्याने आगळा आनंद व्यक्त केला आहे. 

सिक्रेट सुपरस्टार हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. दंगलनंतर आमीर या चित्रपटामधून पुन्हा लोकांच्या समोर येईल.