रिव्ह्यू Live तुला कळणार नाही : हॅंग झालेल्या नात्याची गोष्ट

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

या शुक्रवारी रिलीज झालेला चित्रपट आहे तुला कळणार नाही. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करते आहे. नातं हॅंग झालं की ते पुन्हा रिस्टार्ट करायला हवं ही साधारण याची वन लाईन म्हणता येईल. स्वप्ना वाघमारे-जाेशी यांनी यापूर्वी मितवा, फुगे यांच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाची संकल्पना चांगली आहे. पण कमालीचा खेचला गेलेला उत्तरार्ध आणि हट्टाने केलेला विनोद यामुळे हा सगळा प्रकार खोटा आणि कंटाळवाणा होतो. या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू ई सकाळने केला. या चित्रपटाला ई सकाळने दिले 2 चीअर्स. 

पुणे : या शुक्रवारी रिलीज झालेला चित्रपट आहे तुला कळणार नाही. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करते आहे. नातं हॅंग झालं की ते पुन्हा रिस्टार्ट करायला हवं ही साधारण याची वन लाईन म्हणता येईल. स्वप्ना वाघमारे-जाेशी यांनी यापूर्वी मितवा, फुगे यांच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाची संकल्पना चांगली आहे. पण कमालीचा खेचला गेलेला उत्तरार्ध आणि हट्टाने केलेला विनोद यामुळे हा सगळा प्रकार खोटा आणि कंटाळवाणा होतो. या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू ई सकाळने केला. या चित्रपटाला ई सकाळने दिले 2 चीअर्स. 

तुला कळणार नाही : लाईव्ह रिव्ह्यू

ही गोष्ट राहुल आणि अंजलीची आहे. दोघेही इंडिपेंडंट आहेत. या दोघांच्या लग्नाला तीनेक वर्ष लोटली आहेत. पण आता मात्र त्यांचं एकमेकांशी पटत नाही. दोघेही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडतायत. अशावेळी आता विभक्त होण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. अशावेळी राहुलच्या हाती एक डायरी येते. ती डायरी एका मुलाने आपल्या पहिल्या प्रेमाला लिहिलेी असते. ती त्या पहिल्या प्रेमापर्यंत पोचण्याचा निश्चय राहुल करतो. त्याचवेळी अंजलीही कामासाठी बाहेरगावी गेलेली असते. अशातऱ्हेने हे दोघे पुन्हा एका हायवेवर एकत्र भेटतात आणि त्यांचा एकत्र प्रवास सुरू होतो. त्यातून हा चित्रपट फुलत जातो. 

हा विषय खूप महत्वाचा आहे. पण तो फुलवण्यासाठी उत्तरार्धात पेरलेले प्रसंग मात्र रुचत नाहीत. या पटकथेत येणारा पोलीस अधिकारी, मेनका नामक मुलगी, राहुलचा मित्र सचिन अशा मंडळींचं पटकथेत असणं स्वाभाविक न वाटता ओढून ताणून आहे की काय असं वाटू लागतं. यातल्या संवादात येणारे विनोदी संवाद टीव्हीवरच्या तद्दन काॅमेडी शोची आठवण करून देतात. राहुल आणि अंजलीचं भांडणही काॅलेजिएट स्तरावरचं वाटतं. सिनेमाच्या विषयाला या गोष्टी साजेशा नाहीत. 

एकूणात संकल्पना चांगली असूनही पटकथा, संवादांमध्ये हा चित्रपट ताणला गेला आहे. म्हणूनच या चित्रपटाला ई सकाळने दिले 2 चीअर्स.