Alia Pregnancy: आलियाच्या प्रेग्नंसीवर राखीचा टोमणा, 'प्रेग्नंट झाल्यावर...'

मनोरंजन विश्वामध्ये कायम आपल्या अजब गजबपणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून राखी सावंतचं नाव घ्यावे लागेल.
Rakhi Sawant on Alia Bhatt Pregnancy
Rakhi Sawant on Alia Bhatt Pregnancy esakal

Rakhi Sawant Video: मनोरंजन विश्वामध्ये कायम आपल्या अजब गजबपणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून राखी सावंतचं नाव घ्यावे लागेल. बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये राखीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या सीझनमधून (Bigg Boss) राखीनं मोठी लोकप्रियता मिळवली होती. गेल्या काही दिवसांपासून राखी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसून (Entertainmement News) आली आहे. आता तिनं आलिया - रणबीरच्या गुड न्युजवर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ती काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.(Rakhi Sawant on Alia Bhatt Pregnancy)

आलियानं सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. (Bollywood Actor) त्यानंतर तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला होता. दोन महिन्यांपूर्वी आलिया - रणबीरचं मुंबईत लग्न झाले होते. त्यानंतर समोर आलेल्या गुड न्युजमुळे या दोन्ही सेलिब्रेटींवर काही गंमतीशीर मीम्सही व्हायरल झाले होते. त्यांना काही नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. त्यात आता राखी सावंतची भर पडली आहे. राखीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करुन आलियाची खिल्ली उडवली आहे. यासगळ्यात राखीनं आपलं लग्न आणि प्रेग्नंसी यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

राखीनं त्या व्हिडिओमध्ये आलियाचे नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, मी जेव्हा प्रेग्नंट होईल तेव्हा लग्न करेल. आजकाल तर तसेच होताना दिसते आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ओळखले की राखीच्या बोलण्याचा सूर काही वेगळाच आहे. आणि ती कुणाला उद्देशुन बोलते आहे हेही दिसून आले आहे.

Rakhi Sawant on Alia Bhatt Pregnancy
Alia Bhatt Pregnancy: 'मी पार्सल नाही',आलियानं मीडियाला फटकारलं

राखी ही गेल्या काही दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड आदिलच्या सोबत दिसून आली आहे. राखीनं यापूर्वी तिच्या वेगवेगळ्या रिलेशनशिपचा बिनधास्तपणे उल्लेख केला आहे. बिग बॉसमध्ये देखील राखीचं लग्न झाल्याची चर्चा व्हायरल झाली होती. तिनं ज्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचा दावा केला होता त्याचे एक लग्न झाले होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपनचा वाद रंगला होता.

Rakhi Sawant on Alia Bhatt Pregnancy
Alia Bhatt Pregnancy: तर मग आलियानं डीपी का बदलला? नक्की मामला काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com