उमेश आणि तेजश्री दिसणार नव्या सिनेमात

टीम ई सकाळ
रविवार, 4 जून 2017

मुंबई: अभिनेता उमेश कामत आणि तेजश्री प्रधान ही जोडी लवकरच एका नव्या सिनेमात दिसणार आहे. उमेशने ही माहीती ई-सकाळला दिली. 

या नव्या सिनेमाची माहीती देताना उमेश म्हणाला, या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच एकत्र दिसतोय. हा एक रोमॅंटिक सिनेमा आहे. याची गोष्ट आत्ता उघड करता येणार नाही. पण योग्य वेळ आल्यावर याची माहीती आम्ही देऊ.

सध्या उमेश डोंट वरी बी हॅप्पी या नाटकात काम करतो. या नाटकात त्याच्यासोबत स्पृहा जोशी काम करत असून यापूर्वी ही जोडी छोट्या पडद्यावरही झळकली आहे. 