अंकुश, अमृता यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे अनावरण 

Vax statue of Ankush chaudhary Amruta Khanvilkar esakal news
Vax statue of Ankush chaudhary Amruta Khanvilkar esakal news

मुंबई : मॅडम तुसाद हे जगातील अत्यंत प्रसिद्ध असे मेणाचे पुतळे बनविणारे पहिले संग्रालय आहे. जागतिक पातळीवरील प्रसिद्ध आणि नामवंत अशा व्यक्तींची मेणाने अगदी हुबेहूब अशी प्रतिकृती तयार करून ती संग्रलायात प्रदर्शनासाठी ठेवली जाते. परंतु हे सर्व पाहण्यासाठी पर्यटकांना लंडन किंवा दिल्लीला जावे लागते जे सर्वसाधारण लोकांसाठी शक्य नाही. ही गोष्ट सुनील कंदलुर याने हेरली. मूळचा केरळच्या असलेल्या सुनीलने असे संग्रालय उघडण्याचे ठरविले. २००० साली त्याने लोणावळ्यात पहिले संग्रहालय उघडले. त्यात अनेक नामवंत कलाकारांचे आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे पुतळे सजविण्यात आले आहेत. या संग्रहालयाला प्रचंड यश प्राप्त झाले असता त्यांनी नंतर कोची मध्ये दुसरी शाखा उघडली. या त्यांच्या दोन्ही संग्रहालयांमुळे ते ठिकाण खूपच प्रेक्षणीय आणि एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे.

या सगळ्या गोष्टी तडफदार नेतृत्व असलेले आमदार नितेश राणे यांनी हेरले आणि म्हणूनच त्यांनी
वॅक्स म्युझियम देवगडला घेऊन यायचे ठरविले. नेहमीच कोकणच्या विकासासाठी कार्यरत असणारे
नितेश राणे यांनी या म्युझियमद्वारे आंब्यांसाठी प्रसिद्ध अशा देवगडची महती अजूनच वाढवली असे
म्हणण्यास हरकत नाही. गणपती आणि होळी हे सण अनुभवायचे ते म्हणजे कोकणात जाऊनच. या
दोन सणांच्या निमित्ताने चाकरमानी कोकणात येतातच आणि याच कारणास्तव गणेशाचे आगमन
तोंडावर आले असतानाच त्यांनी ह्या म्युझियममध्ये मराठीतील अग्रणीय कलाकार सुपरस्टार अंकुश
चौधरी आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे पुतळे सगळ्यांच्या भेटीस आणले. हे दोघेही तरुण वर्गात अत्यंत प्रसिद्ध आहेत. अंकुश चौधरीच्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनावर भुरळ पाडली आहे तर अमृता खानविलकर हि तिच्या ग्लॅमर आणि स्टाईलसाठी जनमनात प्रसिद्ध आहे.

अनेक तरुण तिच्या अदाकारीवर फिदा आहेत आणि त्यांच्या मनात तिला भेटण्याची नेहमीच इच्छा असते. अनेक मुलींसाठी ती स्टाईल आयकॉन आहे. अशा सगळ्यांच्याच आवडत्या कलाकारांना या
म्युझियममध्ये आणून नितेश राणेंनी चाकरमान्यांना सुंदर अशी भेट दिली आहे. या म्युझियमचे
वैशिष्ट्य म्हणजे संग्रहालयात असणारे अनेक नामवंत कलाकार आणि दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे
पुतळे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान इंदीरा गांधी जागतिक पातळीचा आणि महान
फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी आणि सुपरस्टार रजनीकांत यांचे पुतळे म्युझियमचे आकर्षण आहेत.
पुढील दोन महिन्यात या वॅक्स म्युझियममध्ये प्रेक्षकांना बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन,
सलमान खान, शाहरुख खान तसेच मराठी कलाकार स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांचे वॅक्स स्टॅच्यू पाहायला मिळतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com