'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च; करीना, सोनमचा बिनधास्त अॅटीट्युड 

गुरुवार, 26 एप्रिल 2018

करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या चार मैत्रीणी ज्या एकमेकींपेक्षा खुप वेगळ्या आहेत, त्यांचं बाँडींग या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 

ऑरगॉझम ला हिंदीत काय म्हणतात? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'वीरे दी वेडींग' या सिनेमातून मिळू शकतील हे सिनेमाच्या ट्रेलरवरुन तरी दिसत आहे. चार मैत्रींणींची कहानी, जी मुलींच्या आयुष्यातील 'लग्न' या परंपरेनुसार असलेल्या एकमेव महत्त्वपुर्ण विषयावर फोकस करते. करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या चार मैत्रीणी ज्या एकमेकींपेक्षा खुप वेगळ्या आहेत, त्यांचं बाँडींग या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 
 

नुकताच 'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे करीना ऊर्फ कलिंदी ही बॉयफ्रेंड सुमित व्यास सोबत लग्न करण्यास सज्ज आहे. तिच्या इतर तिघी मैत्रींणीच्या आयुष्यात देखील लग्न या विषयाने वैताग आणलाय. भारतीय पद्धती, परंपरा यांना डोळे झाकुन फॉलो करत केल्या जाणाऱ्या लग्नाच्या विधी यांवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. कलिंदी सध्या तरी या सर्व गोष्टींसाठी तयार नाही तरी तिला हे सगळं फॉलो करावं लागत आहे. या सगळ्या प्रवासात तिच्या तीन मैत्रीणी तिला कशी साथ देतात हे बघणे औत्सुक्याचे असेल. रिया कपूर दिग्दर्शित हा सिनेमा कॉमेडी ड्रामा आहे. सिनेमाच्या शेवटी भावनिक टच देण्यात आला आहे. 

बॉलिवूडमधून देखील 'वीरे दी वेडींग'च्या ट्रेलरचे कौतुक केले जात आहे. करण जोहर यांचे हे खास ट्विट...
 

'वीरे दी वेडींग'ची शुटींग दिल्ली, मुंबई आणि फुकेत (अंदमान) येथे झाली आहे. कोरिओग्राफी फराह खान यांनी केली आहे तर बादशाह याचे पंजाबी रॅप देखील सिनेमात आहे. येत्या 1 जूनला 'वीरे दी वेडींग' रिलीज धमाका करणार आहे.

Veere Di Wedding

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Veere Di Wedding Trailer Launch Kareena Kapoor Sonam Kapoor Rock