भूमिका करू की नको... 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या मागील "बद्रीनाथ की दुल्हनियां' या चित्रपटानंतर छोटासा ब्रेक घेतला होता; पण तिने आता तिच्या चित्रपटांवर काम करायला सुरुवात केली आहे. हरिंदर एस. सिक्का यांच्या "कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित मेघना गुलजार एक चित्रपट बनवत आहेत.

ज्यामध्ये विकी कौशल आणि आलिया भट्ट काम करतील, असे म्हटले जातेय. मेघना गुलजार यांनी आपला मागील चित्रपट "तलवार'च्या यशानंतर हा चित्रपट करण्याचे ठरवलेय. या चित्रपटात आलिया एका काश्‍मिरी मुलीच्या भूमिकेत दिसेल. भारत-पाकिस्तान (1971)च्या युद्धादरम्यान काही महत्त्वपूर्ण माहिती हाती लागू शकेल. या हेतूने ती मुलगी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याबरोबर लग्न करते. ही काश्‍मिरी मुलगी एक पत्नी, मुलगी, गुप्तहेरही आहे आणि देशभक्तही. या चित्रपटाचा विषय अतिसंवेदनशील असल्यामुळे आलियाने बराच वेळ यावर विचार केला. ही भूमिका स्वीकारायची की नाही, हा निर्णय घेणे तिच्यासाठी खूप कठीण काम होते; पण तिच्या वडिलांनी म्हणजेच महेश भट्ट यांनी तिला नीट समजावून सांगितले. मग आलियाने होकार दिला.