विद्या आणि तीन खान 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

विद्या बालन चतुरस्र अभिनेत्रींपैकी एक म्हणून गणली जाते. तिने बॉलीवूडबरोबरच बंगाली चित्रपटातही काम केलंय. "परिणीता', "पा', "कहानी', "इश्‍किया', "द डर्टी पिक्‍चर' यासारखे हिट सिनेमे दिले. त्यामध्ये तिने अनेक नावाजलेल्या कलाकारांबरोबर कामही केलं. पण इंडस्ट्रीत एवढी वर्षं काम करूनही इंडस्ट्रीची जान असलेले तीन खान यांच्याबरोबर तिने आत्तापर्यंत एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. खानांबरोबर काम न करता इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलेली अशीही एक दुर्मिळ अभिनेत्रीच म्हणावी लागेल. "हे बेबी' या तिच्या चित्रपटात शाहरूख खान एका गाण्यात तिच्याबरोबर नाचला होता.

विद्या बालन चतुरस्र अभिनेत्रींपैकी एक म्हणून गणली जाते. तिने बॉलीवूडबरोबरच बंगाली चित्रपटातही काम केलंय. "परिणीता', "पा', "कहानी', "इश्‍किया', "द डर्टी पिक्‍चर' यासारखे हिट सिनेमे दिले. त्यामध्ये तिने अनेक नावाजलेल्या कलाकारांबरोबर कामही केलं. पण इंडस्ट्रीत एवढी वर्षं काम करूनही इंडस्ट्रीची जान असलेले तीन खान यांच्याबरोबर तिने आत्तापर्यंत एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. खानांबरोबर काम न करता इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलेली अशीही एक दुर्मिळ अभिनेत्रीच म्हणावी लागेल. "हे बेबी' या तिच्या चित्रपटात शाहरूख खान एका गाण्यात तिच्याबरोबर नाचला होता. हो, पण ते काही शाहरूख खानबरोबर चित्रपट केला, असं म्हणण्यासारखं नाही. पण नुकताच तिने आमिर खानचा "दंगल' चित्रपट पाहिला आणि ती या चित्रपटाच्या खूपच प्रेमात पडलीय. ती म्हणते, "मी खूप लोभी कलाकार आहे. जी गोष्ट मला चॅलेंज करते, तीच गोष्ट मी स्वीकारते. मला आमिर खानबरोबर काम करण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी एखाद्या चांगल्या स्क्रिप्टची आवश्‍यकता आहे. मी विशिष्ट रोलबाबत विचार केलेला नाहीय.' जर विद्याला आमिरबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तर प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटाची मेजवानी मिळेल, हे मात्र नक्की. 

टॅग्स

मनोरंजन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या श्वास या चित्रपटानंतर संदीप सावंत दिग्दर्शित आगामी 'नदी वाहते' चित्रपटाचे...

01.57 PM

मुंबई : गेस्ट इन लंडन, शादी मे जरूर आना या चित्रपटांमध्ये झळकलेली क्रिती खरबंदा आता देओल कॅम्पमध्ये दिसणार आहे. आगामी यमला पगला...

01.12 PM

मुंबई : आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत...

01.12 PM