होळीची धमाल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

होळी म्हटली की भांग आलीच. मुंबईतही काही ठिकाणी भांग पिण्याची परंपरा आजही पाळली जाते. भांगेची नशा अनुभवलेले काही जण तिच्यापासून चार हात दूरच राहतात. काही महाभाग मात्र बिनधास्त भांग पितात. भांग प्यायलेल्यांचे धमाल किस्से अनेकांनी ऐकले असतील. अभिनेत्री विद्या बालनही एकदा चुकून भांग प्यायली होती. तेव्हापासून ती भांग म्हटली की घाबरते. विद्याने होळीनिमित्ताने काही आठवणी शेअर केल्या. 16 वर्षांची असताना ती चुकून भांग प्यायली होती आणि दिवसभर हसत बसली होती. एका मजेशीर प्रसंगाच्या आठवणी तिने सर्वांना सांगितल्या. होळीचा सण अन्‌ रंग खेळायला खूप आवडतं, असंही ती म्हणाली.

होळी म्हटली की भांग आलीच. मुंबईतही काही ठिकाणी भांग पिण्याची परंपरा आजही पाळली जाते. भांगेची नशा अनुभवलेले काही जण तिच्यापासून चार हात दूरच राहतात. काही महाभाग मात्र बिनधास्त भांग पितात. भांग प्यायलेल्यांचे धमाल किस्से अनेकांनी ऐकले असतील. अभिनेत्री विद्या बालनही एकदा चुकून भांग प्यायली होती. तेव्हापासून ती भांग म्हटली की घाबरते. विद्याने होळीनिमित्ताने काही आठवणी शेअर केल्या. 16 वर्षांची असताना ती चुकून भांग प्यायली होती आणि दिवसभर हसत बसली होती. एका मजेशीर प्रसंगाच्या आठवणी तिने सर्वांना सांगितल्या. होळीचा सण अन्‌ रंग खेळायला खूप आवडतं, असंही ती म्हणाली. तिचं आवडतं होळीचं गाणं आहे, "रंग बरसे भीगी चुनरवाली...' होळी म्हटली की सर्वांच्या ओठी हेच गाणं येतं. माझंही तेच फेव्हरेट होळी सॉंग आहे, असं ती म्हणते.  

Web Title: vidya balan celebreat holi