विद्या पुन्हा बोल्ड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

विद्या बालन आणि तिचे रोल नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत. ती ज्या चित्रपटात असते त्यात कोणत्याही हिरोची गरजच नसते. तिचे रोल नेहमीच ताकदीचे असतात. एक स्त्री म्हणून तिने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत कोणीच करू शकले नाही ते करून दाखवले आहे. पुरुषप्रधान बॉलीवूड संस्कृतीला तिने काहीसा धक्का दिला आहे. अभिनयाच्या बळावर तिने एकापेक्षा एक चित्रपट गाजवले. मग तो "कहानी' असो, "द डर्टी पिक्‍चर' असो वा जुना "किस्मत कनेक्‍शन' असो... ती आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. नुकताच तिच्या आगामी "बेगम जान' चित्रपटाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला.

विद्या बालन आणि तिचे रोल नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत. ती ज्या चित्रपटात असते त्यात कोणत्याही हिरोची गरजच नसते. तिचे रोल नेहमीच ताकदीचे असतात. एक स्त्री म्हणून तिने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत कोणीच करू शकले नाही ते करून दाखवले आहे. पुरुषप्रधान बॉलीवूड संस्कृतीला तिने काहीसा धक्का दिला आहे. अभिनयाच्या बळावर तिने एकापेक्षा एक चित्रपट गाजवले. मग तो "कहानी' असो, "द डर्टी पिक्‍चर' असो वा जुना "किस्मत कनेक्‍शन' असो... ती आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. नुकताच तिच्या आगामी "बेगम जान' चित्रपटाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला. त्यातील विद्याचा डॅशिंग लूक बघून सगळ्यांनाच चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. एक स्वतंत्र अन्‌ निर्भीड स्त्री पोस्टरमधील विद्याच्या चेहऱ्यातून दिसून येते. चित्रपटाची टॅगलाईन आहे, "माय बॉडी माय हाऊस... माय कन्ट्री माय रुल्स.' टॅगलाईनप्रमाणेच विद्याच्या डोळ्यात तो भाव पाहायला मिळतो... चित्रपटात विद्या कुंटणखान्याच्या मॅडमच्या भूमिकेत आहे. भारताच्या फाळणीवेळी कुंटणखान्यातील वेश्‍यांच्या आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथीवर "बेगम जान'ची कथा आधारीत आहे. श्रीजीत मुखर्जीचा हा चित्रपट असून, त्यानिमित्ताने तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. हा चित्रपट श्रीजीतच्या "राजकाहिनी' या बंगाली चित्रपटापासून प्रेरित आहे.