विद्या बालन "हवा हवाई' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

बॉलीवूडची "उलाला गर्ल' विद्या बालनच्या अभिनयाचे जलवे सर्वांनीच पाहिलेत. "डर्टी पिक्‍चर'मध्ये तिच्यातलं डान्सिंग स्कीलही दिसलं. पाहायला गेलं तर विद्या फार चांगली डान्सर नाही; पण तिचं "उलाला' गाणं प्रचंड हिट झालं.

तिच्या ठुमक्‍यांवर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. आता ती "मिस्टर इंडिया' चित्रपटातील श्रीदेवीचं गाजलेलं गाणं "हवा हवाई'वर थिरकताना दिसणार आहे. विद्याचा आगामी चित्रपट "तुम्हारी सुलू'मध्ये हे गाणं पाहायला मिळेल. "तुम्हारी सुलू' टी सीरिज व एलिपिस एंटरटेन्मेंटची निर्मिती असून, तनिष्क बागची "हवाहवाई' गाणं रिक्रिएट करत आहे.

तनिष्क बागची यांनी रिक्रिएट केलेली "हम्मा हम्मा' व "तम्मा तम्मा' गाणी चांगलीच हिट ठरलीत. चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी करणार आहेत. "हवाहवाई' गाण्याला कविता कृष्णमूर्तीच स्वरसाज देणार आहेत. कोरिओग्राफी राजीव सुरती यांची असेल. विद्यासोबत नेहा धुपियाही त्या गाण्यावर थिरकणार आहे. "तुम्हारी सुलू' 1 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येईल.