नव्या वर्षात विनोद खन्नाच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

बॉलिवूडमध्ये रोज नवे चेहरे येतात, यातील काही चेहऱ्यांची भरपूर चर्चा होते. या यादीत आता विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा साक्षी खन्ना हे एक नाव ऍड होत आहे. साक्षी विनोद खन्ना "धडकन' चित्रपटातून पदार्पण करण्याची शक्‍यता आहे,अशी चर्चा बॉलिवूडच्या वर्तुळात रंगत आहे. नव्या वर्षात विविध बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचेही चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. यांत श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी जान्हवीच्याही पदार्पणाची चर्चा आहे. 

एका संकेतस्थळावर आलेल्या वृत्तानुसार "धडकन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते. या वृत्तामध्ये साक्षी "धडकन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचेही म्हटले आहे. वडिलांप्रमाणेच साक्षीदेखील प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या लूक्‍स, भूमिकांमुळे राज्य करू शकेल का? याची उत्सुकता असणार आहे. "धडकन' या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. 
2000मध्ये प्रर्दशित झालेल्या "धडकन' या चित्रपटात अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि शिल्पा शेट्टी असे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी जबरदस्त डोक्‍यावर घेतले होते. "धडकन'च्या सिक्वेलमध्ये श्रद्धा कपूर आणि फवाद खान हे मुख्य भूमिकेत दिसतील,अशी चर्चा रंगत होती.मात्र "ए दिल मुश्‍किल' या चित्रपटाच्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना झालेला विरोध पाहता फवाद खानचे नाव या चित्रपटातून वगळण्यात आले.