काश्मीर फाईल्सवर टीका करणाऱ्या पवारांना अग्निहोत्री म्हणतो दुटप्पी; म्हणाला...

काश्मिर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवार यांना ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
Vivek Agnihotri tweet to Sharad Pawar
Vivek Agnihotri tweet to Sharad PawarSakal

‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेऊन भाजप देशभरामध्ये दिशाभूल करणारा प्रचार आणि गैरसमज पसरवत आहे. या माध्यमातून देशात विखारी वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. यावर काश्मिर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्वीटच्या माध्यमातून शरद पवार यांना उत्तर दिले आहे.

"मी काही दिवसांपूर्वीच एका फ्लाइटमध्ये श्री. शरदजी पवार आणि त्यांच्या पत्नीला भेटलो, त्यांच्या चरणांना स्पर्श केला. या दोघांनी माझे आणि पल्लवी जोशी यांचे चित्रपटाबद्दल अभिनंदन केले आणि आशीर्वाद दिले. मीडियासमोर त्याचं काय झालं माहीत नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असला तरीही मी त्यांचा आदर करतो," असं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. (Vivek Agnihotri responded to Sharad Pawar's criticism of Kashmir files by tweet)

Vivek Agnihotri tweet to Sharad Pawar
बच्चन पांडे केला बंद, काश्मिर फाईल्स सुरु: ओडिसातील थिएटरमध्ये राडा

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेऊन भाजप देशभरामध्ये दिशाभूल करणारा प्रचार आणि गैरसमज पसरवत आहे. या माध्यमातून देशात विखारी वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमामधून देखील लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी असा दावा केलाय की, काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागलं होतंच पण, त्याठिकाणी मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेलं होतं. (Sharad Pawar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com