आमच्या साखरपुड्याच्या अफवाच : विराट कोहली 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

डेहराडून : 'अभिनेत्री अनुष्का शर्माशी साखरपुडा होणार असल्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहेत' असे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज (शुक्रवार) स्पष्ट केले. याआधी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, येत्या रविवारी (1 जानेवारी) विराट आणि अनुष्का यांचा ऋषिकेशमध्ये साखरपुडा होण्याची दाट शक्‍यता होती. 

विराट-अनुष्का सध्या ऋषिकेशमध्ये आहेत. याच ठिकाणी त्यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा होती. यासंदर्भात विराटने ट्विट करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे. 

'आमचा साखरपुडा नाही! आम्ही साखरपुडा करणारच असतो, तर ते लपवून ठेवले नसते. पण अशा वृत्तवाहिन्यांनी अफवा खपवित तुम्हाला गोंधळात टाकले. त्यामुळे आम्ही फक्त हा गोंधळ दूर करत आहोत,' असे ट्‌विट विराटने केले. अनुष्का शर्मानेही 'रि-ट्विट' करत ही चर्चा थांबविली. 

नाताळच्या सुट्टीसाठी विराट-अनुष्का 24 डिसेंबर रोजी ऋषिकेशमध्ये दाखल झाले होते. या कालावधीमध्ये त्यांनी चाहत्यांशी संवादही साधला नाही. त्यानंतर या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चेला उधाण आले होते.

Web Title: We are not getting engaged; Tweets Virat Kohli and Anushka Sharma