आम्हाला काही फरक पडत नाही... 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी आपल्या करियरची सुरुवात एकत्रच केली.

आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी आपल्या करियरची सुरुवात एकत्रच केली. त्यानंतर या दोघांनी स्टुडंट ऑफ द इयरनंतर हम्प्टी शर्मा की दुल्हनियॉं आणि बद्रिनाथ की दुल्हनियॉं या चित्रपटांत एकत्र काम केले होते.

लोकांनाही त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूपच आवडते. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीपेक्षाही जास्त काही आहे अशी खूप आधीपासून चर्चा होती, पण यावर वरुण धवनने अखेर आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणतो माझ्यात आणि आलियामध्ये सगळे काही ठीक आहे. मी आणि आलियाने अनेक वेळा एकत्र काम केले आहे. आम्हाला एकत्र काम करायला मजाही येते. तुम्ही जेव्हा स्टार असता तेव्हा या सगळ्याचं पॅकेजही त्याबरोबर तुम्हाला मिळतं. त्यामुळे या अफवांचे आम्हाला काहीही वाटत नाही.