क्रिती खरबंदाची दीपिका फेव्हरिट 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जून 2017

अभिनेत्री क्रिती खरबंदाचे सध्या "अतिथी इन लंडन' आणि "शादी में जरूर आना' हे दोन चित्रपट येऊ घातले आहेत. क्रिती आणि दीपिका पदुकोन...

दोघी बंगळूरूच्या. लहान असतानाच त्या एका ऑडिशनच्या निमित्ताने एकमेकींना भेटल्या होत्या. दीपिका तेव्हा 16 वर्षांची, तर क्रिती 12 वर्षांची होती. ती म्हणाली, "खूप वर्षांपूर्वी एका जाहिरातीसाठी तिच्या लहान बहिणीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी ऑडिशनला गेले होते.

तिचे त्यावेळी अभिनेत्री वगैरे बनायचे निश्‍चित नव्हते. मीही खूप लहान होते. ती खूपच छान, गुणी आणि सुंदर अभिनेत्री आहे. मी ज्या चांगल्या लोकांना भेटले त्यातील ती एक आहे. मी जेव्हा ऑडिशनला गेले तेव्हा तिने मला समजून घेतले.'