सुपरस्टारची गरजच काय? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

माझा सिनेमा हिट होण्यासाठी कुठल्याही सुपरस्टारची गरज नाही. असं म्हणतेय बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्‌ट. हायवेपासून ते आताच्या बद्रिनाथ की दुल्हनिया अशा एकापेक्षा एक सिनेमांनी प्रेक्षकांचं मन जिंकणारी आलिया आपला पुढील सिनेमा मेघना गुलजार हिच्यासोबत करत आहे.

या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. आलियाने बॉलीवूडमधील सुपरस्टारसोबत या आधी काम केलं आहे. त्यामुळे विकी कौशलसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे. असं विचारल्यावर आलियाने सांगितलं की, इथे आपण सगळे चांगलं काम करण्यासाठी येतो आणि त्याच प्रयत्नात आपण असा विचार करत असतो की हा सिनेमा आपल्या आधीच्या सिनेमापेक्षा चांगला कसा होईल.

तसंही मला माझा सिनेमा हिट होण्यासाठी कुठल्याही सुपरस्टारची गरज नाही. सिनेमा हिट होण्यासाठी चांगली कथा लागते. चांगले दिग्दर्शक हवेत आणि मी अशाच सिनेमाची निवड करते ज्यातील व्यक्तिरेखा साकारायला मला मजा येईल. माझा हाच विचार माझ्या अभिनय कारकिर्दीला पुढे घेऊन जाईल. वा, मानलं तुला आलिया. तुझे विचार तर छानच आहेत. फक्त यावर ठाम राहा...