का सोडू मी टीव्ही? 

संकलन : भक्ती परब  
बुधवार, 22 मार्च 2017

"का सोडू मी टीव्ही?' असं दुसरं-तिसरं कुणी नाही; खुद्द साक्षी विचारतेय. का? तर तिला हल्ली सगळे प्रश्‍न विचारतात, दंगल हीट झाला म्हणजे आता तुम्ही टीव्हीवर दिसणार नाही. पण सतत 16 वर्षे छोट्या पडद्यावर अभिनय करणारी साक्षी तन्वर म्हणतेय, मी टीव्हीवर इतकी वर्षं काम करतेय. मग का जाईन मी मोठ्या पडद्यावर. आणि तसंही अभिनय हा अभिनय असतो. त्यात छोटा पडदा, मोठा पडदा असा भेदभाव कशाला? "कहानी घर घर की', "बडे अच्छे लगते है' या लोकप्रिय मालिकांनंतर साक्षीने दंगल सिनेमात काम केलं. तोही सिनेमा हीट झाला. त्यामुळे साक्षी आता पुन्हा मालिकांत काम करणार का? तर याचं उत्तर साक्षीनेच दिलंय.

"का सोडू मी टीव्ही?' असं दुसरं-तिसरं कुणी नाही; खुद्द साक्षी विचारतेय. का? तर तिला हल्ली सगळे प्रश्‍न विचारतात, दंगल हीट झाला म्हणजे आता तुम्ही टीव्हीवर दिसणार नाही. पण सतत 16 वर्षे छोट्या पडद्यावर अभिनय करणारी साक्षी तन्वर म्हणतेय, मी टीव्हीवर इतकी वर्षं काम करतेय. मग का जाईन मी मोठ्या पडद्यावर. आणि तसंही अभिनय हा अभिनय असतो. त्यात छोटा पडदा, मोठा पडदा असा भेदभाव कशाला? "कहानी घर घर की', "बडे अच्छे लगते है' या लोकप्रिय मालिकांनंतर साक्षीने दंगल सिनेमात काम केलं. तोही सिनेमा हीट झाला. त्यामुळे साक्षी आता पुन्हा मालिकांत काम करणार का? तर याचं उत्तर साक्षीनेच दिलंय. साक्षीसाठी सिनेमा, वेब आणि मालिका सर्वच माध्यमं सक्षम आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून कुठल्याही माध्यमात झोकून देऊन काम करावं, असं साक्षीला वाटतं. आता लवकरच साक्षी राम कपूरसोबत "कर ले तू भी मोहब्बत' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही मालिका फक्‍त 14 भागांची असणार आहे. त्यानंतर साक्षी टीव्हीवरही दिसेलच की... 

Web Title: why should i leave from television sakshi tanwar