महिला दिन विशेष: पडद्यामागील 'ती'चा प्रवास

women
women

बॉलिवूड चित्रपटामधील अभिनेत्रींचा चाहता वर्ग मोठा आहे. त्या पडद्यावर दिसतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना लोकप्रियता मिळते. पण पडद्यामागील कलाकारांना तितकी प्रसिद्धी मिळत नाही. चित्रपटसृष्टीतील अश्याच काही कर्तुत्ववान महिलांबद्दल माहिती घेऊयात.    

गौरी शिंदे 

प्रसिद्ध दिग्दर्शिका गौरी शिंदेने हिंदी चित्रपट सृष्टीत विशेष स्थान निर्माण केले आहे. तिच्या हटके चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. गौरीचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातील सिंबॉयसेस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या महाविद्यालयात तिने शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिला फिल्म मेकिंगमध्ये आवड निर्माण झाली. फिल्म मेकिंगमधील करिअरची सूरूवात तिने मुंबईमधील माहितीपट दिग्दर्शक सिद्धार्थ काक सोबत इंटर्नशिप केली. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींसाठी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यावेळी गौरीने 100 जाहिरातींचे दिग्दर्शन केले. जाहिरात क्षेत्रात काम करतानाच गौरीने चित्रपट दिग्दर्शन करण्यास सुरूवात केली. गौरीच्या 'ओह मॅन' या  शोर्ट फिल्मची फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली. 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटामधून गौरीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर गौरीच्या डियर जिंदगी या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.        

फराह खान 

बॉलिवूडमधील कलाकारांना आपल्या तालावर थिरकवणारी चित्रपट आणि नृत्य दिग्दर्शिका म्हणजे फराह खान. बॉस लेडी अंदाजामुळे फराहने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. फराहने हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मै हू ना, ओम शांती ओम, तीस मार खान, हॅप्पि न्यु इयर या बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन फराहने केले आहे.

मेघना गुलजार 

Women's day 2021 : "गिनीज'ने गौरवलेल्या सोलापूरच्या आयएएस रोहिणी...

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार आपल्या चित्रपटांमधून नेहमीच प्रेक्षकांना संदेश देते. मेघना ही प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांची मुलगी आहे. मेघनाने तिच्या चित्रपट क्षेत्रातील करियरची सुरूवात सइद अख्तर मिर्झा यांच्या सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. 1995 मध्ये मेघनाने फिल्म मेकिंगमध्ये एक कोर्स केला. फिलाल, जस्ट मॅरिड, दस कहानीया, तलवार, राझी, छपाक या चित्रपटांचे दिग्दर्शन मेघनाने केले आहे.

रीमा कागती

बॉलिवूडमध्ये हटके चित्रपटांची निर्मीती करणाऱ्या दिग्दर्शिका म्हणजे रिमा कागती. तिच्या प्रत्येक चित्रपटांच्या कथेची मांडणीला प्रेक्षकांची पसंती मिळते. हनिमून ट्रॅव्हल्स, रॉक ऑन, तलाश, गोल्ड या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन रीमा कागती यांनी केले आहे. तसेच लगान, दिल चाहता है, गली बॉय, लक्ष्य, जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटांसाठी रिमाने सहाय्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

अपर्णा सेन 

हिंदी चित्रपट सृष्टीतील अपर्णा सेन या प्रसिध्द दिग्दर्शिका आहेत. हिंदीसोबतच बंगाली चित्रपटांचे देखील दिग्दर्शन अपर्णा सेन यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार अपर्णा यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी मिळाला आहे.       

मीरा नायर

मीरा नायर या त्यांच्या आर्टीस्टीक चित्रपट दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. मीरा यांनी अनेक माहितीपट आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. भारत सरकारने मीराना पद्मश्रीने सन्मानित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com