लेखिका सोहा अली खान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

अभिनेत्री सोहा अली खान लेखिका बनली आहे, हे ऐकल्यावर जरा गोंधळायला झाले असेल ना. आता ही कोणत्या सिनेमात लेखिकेचा रोल करतेय? अहो, ती कोणत्या चित्रपटात लेखिकेची भूमिका साकारत नसून ती खरोखर लेखन करतेय. म्हणजे ती लवकरच अभिनेत्रीसोबतच लेखिका म्हणून ओळखली जाणारेय. या वर्षी तिच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक पूर्णपणे सोहाच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित आहे. एक रॉयल प्रिन्सेस ते एक सेलिब्रिटी या तिच्या प्रवासातील बऱ्या-वाईट अनुभवांसह काही आठवणी व क्षण तिच्या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.

अभिनेत्री सोहा अली खान लेखिका बनली आहे, हे ऐकल्यावर जरा गोंधळायला झाले असेल ना. आता ही कोणत्या सिनेमात लेखिकेचा रोल करतेय? अहो, ती कोणत्या चित्रपटात लेखिकेची भूमिका साकारत नसून ती खरोखर लेखन करतेय. म्हणजे ती लवकरच अभिनेत्रीसोबतच लेखिका म्हणून ओळखली जाणारेय. या वर्षी तिच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक पूर्णपणे सोहाच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित आहे. एक रॉयल प्रिन्सेस ते एक सेलिब्रिटी या तिच्या प्रवासातील बऱ्या-वाईट अनुभवांसह काही आठवणी व क्षण तिच्या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. "द पेरिल्स ऑफ बीइंग मॉडेरेट्‌ली फेमस' असे या पुस्तकाचे नाव असून, पेंग्विन इंडिया हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. मध्येच असे लेखिका बनण्याचे खूळ हिच्या डोक्‍यात कसे आले याबद्दल ती सांगते की, "मला पुस्तके वाचायला आवडतात. मी एका मिनिटात पाचशे-दहा शब्द वाचू शकते. त्यामुळे मला कदाचित लिखाण करणे अवघड जात नाही. माझ्याकडेही इतर कलाकारांप्रमाणे काही वेळ मोकळा असतो. काहीतरी क्रिएटिव्ह लिहिण्यासाठी मी या वेळेचा सदुपयोग नक्कीच करू शकते.' सोहाने लिहिलेले हे पुस्तक कसे आहे ते पुस्तक बाजारात आल्यावरच कळेल...!