खलनायिका यामी गौतम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

आतापर्यंत आपण अभिनेत्री यामी गौतमला रुपेरी पडद्यावर साध्या, सोज्वळ मुलीच्या भूमिकेत पाहिलं आहे. मात्र आता तिचा ग्रेशेड अंदाजही आपल्याला पाहायला मिळणार आहे. 'सरकार 3' चित्रपटात ती खलनायिकेचा रोल करतेय. यात ती आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेताना दिसणार आहे.

पहिल्यादांच निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी यामी खूपच उत्सुक आहे. तसेच बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार असल्याने ती खूशही आहे. तिने सांगितले की, बिग बींसोबत काम करण्याची खूप इच्छा होती. आता त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे आणि माझं स्वप्न सत्यात उतरलं आहे. हा प्रोजेक्‍ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 

यामीला साचेबद्ध भूमिका करायच्या नाहीयेत. ती म्हणते की, मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. त्याचबरोबर नवनवीन प्रयोग करायचे आहेत. मी नेहमीच प्रत्येक सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसण्यासाठी प्रयत्न करते. ही लोभस यामीने साकारलेली खलनायिका कशी असणार? त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणारेय. 
 
Web Title: Yami gautam to play villain in sarkar 3