अविनाश गोवारिकर म्हणतायत 'येरे येरे पैसा'!

रविवार, 22 ऑक्टोबर 2017

हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी आपल्या सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला
आहे ज्यात तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव हे मराठीतले ४ मोठे कलाकार दिसत आहेत. ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ च्या पोस्टरसाठी च फोटोशूट खुद्द अविनाश गोवारीकर यांनी केलंय.

 

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी आपल्या सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला
आहे ज्यात तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव हे मराठीतले ४ मोठे कलाकार दिसत आहेत. ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ च्या पोस्टरसाठी च फोटोशूट खुद्द अविनाश गोवारीकर यांनी केलंय.

दंगल , जुडवा २, मुबारका, बद्रीनाथ कि दुल्हनिया अशा एक ना अनेक बॉलीवूड चित्रपटांची पोस्टर्स गोवावारीकर यांनी केली आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान असे मोठे कलाकार असोत किंवा वरून धवन, आलिया भट्ट सारखे सध्याचे तरुण कलाकार असोत, प्रत्येकालाच अविनाश गोवारीकर यांनी आपल्या कॅमेरातून उत्तम टिपले आहे. त्यांच्यासोबत काम करणे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातला फार उत्सुकतेचा आणि महत्त्वाचा क्षण असतो!

आणि आता ह्याच नावाजलेल्या फोटोग्राफरने संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ ह्या चित्रपटाचे फोटोशूट केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरसाठी गोवारीकरांनी अनेक संकल्पना अमलात आणल्या. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या अफलातून कल्पनेतून खूपच वेगळ्या प्रकारे हे फोटोशूट झाले आहे. अविनाश गोवारीकारांसोबत काम करण्याचा अनुभव चित्रपटाच्या कलाकारांसाठी नक्कीच खूप रंजक होता. गोवारीकरांनी पोस्ट केलेल्या फोटोतून हा उत्साह आपल्याला नक्कीच जाणवतो.

तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव अशी चित्रपटाची स्टारकास्ट तर तगडी आहेच. परंतू आता चित्रपटाचे पोस्टरही तगडे होईल यात काहीच शंका नाही!