‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

संजय जाधव यांचे दिग्दर्शन असणाऱ्या बहुचर्चित  ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त समारंभ मुंबईत पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. 

मुंबई : संजय जाधव यांचे दिग्दर्शन असणाऱ्या बहुचर्चित  ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त समारंभ मुंबईत पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. 

सोबतच चित्रपटाची स्टारकास्ट हि रिव्हील करण्यात आली. स्टारकास्टला घेऊन जी उत्सुकता जनमनात वाढली होती तिला
पूर्णविराम मिळाला. संजय जाधव गॅंग मधील हि स्टारकास्ट नसून यावेळी एक वेगळी स्टारकास्ट संजय जाधव प्रेक्षकांच्या
भेटीस घेऊन येत आहेत. ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल
कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. चित्रपटाचा विषय हा
वास्तवात असलेल्या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच कॉमेडी, लव्ह स्टोरी, थ्रिलर या विषयांमध्ये मर्यदित नसून
नवीन परिभाषा असेलेला असेल. 

मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची उपस्थिती मुहूर्ताला लाभली. 'ये रे ये रे पैसा’ चित्रपटाची एव्हीके फिल्म्स, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली निर्मिती, ओम प्रकाश भट, अमेय खोपकर आणि सुजय शंकरवार यांनी केली आहे. ‘ये रे ये रे पैसा’ हा पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार