कला-शिक्षकाचा कलाविष्कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये रेखाटले उस्ताद झाकीर हुसेन यांचे चित्र 
मुंबई स्थित पुण्याच्या "सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन'मधील कला-शिक्षक विशाल विजय वाडये यांनी नुकतेच रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या प्रांगणात 3500 रसिकांच्या साक्षीने लाईव्ह कन्सर्टमध्ये जगविख्यात झाकीर हुसेन यांचे तैलचित्र रेखाटले. ते चित्र पाहून आभाळाएवढ्या उस्तादजींनी विशालला मनःपूर्वक शाबासकी दिली. 

या सोहळ्यात विशालने दीड तासाच्या मैफलीत लाईव्ह पेंटिंग केले. "ठराविक एका अंतरावर राहून, वादकाचे लक्ष विचलित न करता आणि वादक दिसेल अशा ठिकाणी राहून' त्याला पेंटिंग करायचे होते आणि त्याने हे आव्हान नीट पेलले. तबल्यावर साक्षात उस्ताद झाकीर हुसेनजी होते. उस्तादजींचं तबलावादन आणि तालनिर्मितीसोबत त्यांची तमाम रसिकांशी सुसंवाद साधण्यातली पराकोटीची रंजकता रंगरेषांमधून जिवंत अनुभवताना विशालचा कुंचला त्यांच्या तालावर कॅनव्हॉसवर थिरकत होता. चित्राची मांडणी करताना त्यांच्या लाईकनेसचा तो वारंवार विचार करीत होता. मैफल समाप्तीची वेळ झाल्यावर तबला थांबला आणि त्याचा कुंचलाही थांबला. त्यानंतर विशालने उस्तादजींजवळ जाऊन स्वतः रेखाटलेले चित्र त्यांना दिले आणि त्यांना वाकून नमस्कार केला. उस्तादजींना ते स्वतःचे चित्र पाहून विश्‍वासच बसत नव्हता. त्यांनी विशालची विचारपूस केली आणि त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांचे आभार मानून या सोहळ्याची सांगता झाली. 
 
मनोरंजन

मुंबई : काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग प्रत्येक घराघरात आणि सार्वजनिक मंडळात आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्या...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : सन्मान स्त्रीच्या लढण्याचा , गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन यावर्षीचा ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : डेव्हीड धवन दिग्दर्शित जुडवा 2 ची प्रतिक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण आज या सिनेमाचा ट्रेलर लाॅंच झाला. वरूण धवन...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017