झी मराठीवर नवीन शो

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

"श्रीयुत गंगाधर टिपरे'नंतर आपल्या सगळ्यांचे लाडके आबा परत एकदा झी मराठीवरील नवी मालिका "चूकभूल द्यावी घ्यावी' यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला आहेत लाडक्‍या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी. "चूकभूल द्यावी घ्यावी' या प्रसिद्ध नाटकावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत राजाभाऊ व मालती या वयोवृद्ध जोडप्याची लव्हस्टोरी आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्यांच्यातील प्रेम टिकून आहे. तसेच या प्रेमातला खट्याळपणा आणि गोडवा कमी झालेला नाही. या दोघांच्या खुसखुशीत नात्यातील गंमत या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

"श्रीयुत गंगाधर टिपरे'नंतर आपल्या सगळ्यांचे लाडके आबा परत एकदा झी मराठीवरील नवी मालिका "चूकभूल द्यावी घ्यावी' यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला आहेत लाडक्‍या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी. "चूकभूल द्यावी घ्यावी' या प्रसिद्ध नाटकावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत राजाभाऊ व मालती या वयोवृद्ध जोडप्याची लव्हस्टोरी आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्यांच्यातील प्रेम टिकून आहे. तसेच या प्रेमातला खट्याळपणा आणि गोडवा कमी झालेला नाही. या दोघांच्या खुसखुशीत नात्यातील गंमत या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका 18 जानेवारीपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे

Web Title: zee marathi new show

टॅग्स