झी युवाची दमदार "वर्षपूर्ती"

टीम ई सकाळ
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

"नवे पर्व...युवा सर्व "असे बिरूद घेऊन आलेल्या झी युवा या नव्या चॅनेलने वर्षभरातच युवास्पंदने अचूक टिपली. आजच्या उत्साहाने सळसळत्या तरूणाईला त्यांच्या मनातील तरंग उमटवणारे मनोरंजन देणाऱ्या कार्यक्रमांची नांदीच जणू झी युवा या चॅनेलने केली. मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेललाइफ अशा आजच्या तरूणाईच्या भावविश्वाचे आकाशच जणू झी युवा या चॅनेलने आपल्या कवेत घेतले.

मुंबई : झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे, त्यांच्या भावविश्वाशी जोडणारे कित्येक कार्यक्रम हा झी नेटवर्कचा श्वास आहे. झी मराठी असो, झी टॉकीज, झी स्टुडीओ असो वा चोवीस तास प्रेक्षकांना जगभरातील बातम्या पोहचवणारे झी २४ तास असो. वाहिनी वेगळी असली तरी प्रत्येक वाहिनीचा बाज हा कुटुंबातील प्रत्येकाच्या मनोरंजन आणि माहितीस्रोताचा धागा. या धाग्याने महाराष्ट्रातील लाखो कुटुंब एका वेगळ्याच नात्याने गुंफली आहेत. प्रेक्षकांच्या सुखदु:खाचे एकेक क्षण, सणसमारंभाचे सोहळे यामध्येही झी वाहिनीने आपला सहभाग दिला आहे. झी नेटवर्क आणि मराठी प्रेक्षक यांच्या या कित्येक वर्ष असलेल्या ऋणानुबंधाच्या धाग्यात गेल्या वर्षीच्या २२ ऑगस्टला, ‘झी युवा’ हे आणखी एक पुष्प गुंफले गेले.
 
"नवे पर्व...युवा सर्व "असे बिरूद घेऊन आलेल्या झी युवा या नव्या चॅनेलने वर्षभरातच युवास्पंदने अचूक टिपली. आजच्या उत्साहाने सळसळत्या तरूणाईला त्यांच्या मनातील तरंग उमटवणारे मनोरंजन देणाऱ्या कार्यक्रमांची नांदीच जणू झी युवा या चॅनेलने केली. मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेललाइफ अशा आजच्या तरूणाईच्या भावविश्वाचे आकाशच जणू झी युवा या चॅनेलने आपल्या कवेत घेतले.

तरूणाईची भाषा बोलणाऱ्या झी युवाला प्रेक्षकांमधील तरूणाईन डोक्यावर न घेईल तरच नवल. त्यामुळेच अवघ्या वर्षभरातच खऱ्या अर्थाने तरूणाईच्या जगातील प्रत्येक भावना टिपणाऱ्या एका गुलाबी पर्वाने झी युवा हे नाव मनाने तरूण असलेल्या प्रत्येकाच्या मनावर कोरले. नवनवीन कार्यक्रम आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी सुद्धा झी युवा च्या सोशल मीडिया टीम ने केलेले वेगवेगळे प्रयोग प्रेक्षकांनी उचलून धरले. आज २२ ऑगस्ट २०१७ ला वाहिनीला एक वर्ष पूर्ण होतंय.  झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की,' आम्ही झी युवा ही वाहिनी सुरु करताना केवळ दर्जेदार मनोरंजन करू हे सांगितले होते आणि त्या प्रमाणे आजच्या युवा प्रेक्षकांना आवडतील असेच अतिशय निवडक कार्यक्रम दाखवले. “नवे पर्व... युवा सर्व “म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली ‘झी युवा ' ही युथफूल वाहिनी बघता बघता एक वर्षाची झाली. मराठी मनोरंजन विश्वात अगोदरपासून भक्कमपणे पाय रोवून असलेल्या अनेक वाहिन्यांपेक्षा, एक वेगळं हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी, झी युवा या वाहिनीने भरपूर मेहनत घेत गेल्या वर्षाभरात अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. सरगम, संगीत सम्राट, लव्ह लग्न लोचा, रुद्रम या कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला . सोशल मीडिया वर सुद्धा प्रेक्षकांनी वहिनीला भरपूर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळेच झी युवा या पुढेही असेच चांगले आणि वेगळे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नक्कीच घेऊन येईल याची मी खात्री देतो '
 
जेव्हा झी युवा वाहिनी सुरु झाली तेव्हा, काहीसा मितभाषी सौमित्र आणि बिनधास्त मैत्रयी ही जोडी ‘बन मस्का’ या मालिकेचा यूएसपी होती. यातील ब्रेकअप आणि पॅचअप या तरूणाईच्या जगातील परवलीच्या शब्दामुळेही मालिका तरूणाईला आपली वाटली. ७ शहरांमधून आलेले ७ ‘फ्रेशर्स’ त्यांच्यातील मैत्रीच्या अनोख्या केमिस्ट्रीने हिट ठरले. मैत्रीमध्ये एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवण्यात काय समाधान असतं ते या मालिकेने दाखवून दिले. ‘तेरी मेरी यारी...मग बुकात गेली दुनियादारी’ हे शिरवळकरांचे शब्द या मालिकेतून तरूणाई अक्षरश: जगली. ‘श्रावणबाळ रॉकस्टार’ मालिका ऑफएअर जाऊनही ऋषी आणि नीतूची जोडी तरूणाईमध्ये फेमस आहे. शशांक केतकरच्या अभिनयाने सजलेली ‘इथेच टाका तंबू’ असो किंवा ‘शौर्य’ सारखा हटके प्रयोग.... सगळ्याच मालिकांनी ‘झी युवा’ ह्या वाहिनीला मनोरंजनातील एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ‘संगीत सम्राट’ आणि ‘सरगम’ या कार्यक्रमांची संकल्पनाच इतकी वेगळी होती की यामुळे ‘झी युवा’ हे चॅनेल अभिरूचीचा कळसाध्याय ठरला. कॉलेजमध्ये किंवा विविध शहरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची भटकंती करणाऱ्या ‘युवागिरी’ नेही धमाल आणली. पुण्यात शनिवारवाडाच्या साक्षीने झालेला ‘युवोत्सव’, कोल्हापुरात रंगलेला ‘कल्ला’ या इव्हेंटने ‘झी युवा’ च्या कलाकांराना ग्लॅमर तर आले पण लोकप्रियताही मिळाली. सकाळच्या स्लॉटमध्ये मराठी गाणी तर दुपारचा वेळ मराठी सिनेमे हा सुवर्णमध्यही ‘झी युवा’ ने साधला आहे. परिपूर्ण मनोरंजन म्हणजे ‘झी युवा’ हा अनुभव प्रेक्षकांना देण्यात बाजी मारली आहे. एक वर्षांनंतरही हिट असलेली ‘लव्ह लग्न लोचा’ ही मालिका म्हणजे प्रत्येक तरूणाईला त्यांची स्वताची कथा वाटते इतकी ती रिलेट करतेय. हॉस्पिटलच्या भावविश्वावर आधारित असलेली 'अंजली’, कॉलेज विश्वातील प्रेमी युगल दाखवणारी 'फुलपाखरू ‘, कुटुंबातील एका व्यक्तीच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करीत असलेलया कुटुंबाची गोष्ट असलेली 'जिंदगी नॉट आउट ‘, अनाकलनीय भयाची एक गूढ कथा 'गर्ल्स हॉस्टेल ' आणि एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती’ च्या प्रतिशोधाचा थरार म्हणजेच ‘झी युवा’वर नवीन आलेली ‘रुद्रम’ ही मालिका , या सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलय.
 
सुरवातीला ‘झी युवा’ वाहिनीच्या मालिकेतील सुहास जोशी, ज्योती सुभाष, विवेक लागू, तुषार दळवी, विजय पटवर्धन, विद्याधर जोशी, जयवंत वाडकर, सुप्रिया पाठारे, राजेश देशपांडे, सुप्रिया विनोद, अभय कुलकर्णी, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, सक्षम कुलकर्णी, ओमकार गोवर्धन, विवेक सांगळे, श्रीकर पित्रे, सिद्धी कारखानीस, समीहा सुळे, रुचिता जाधव, समीर खांडेकर , शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, शशांक केतकर, मधुरा देशपांडे, संदीप पाठक, रश्मी अनपट, मीताली मयेकर, अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर, शुभांकर तावडे, सिद्धार्थ खिरीड, ओंकार राऊत, अभय कुलकर्णी, नीरज, संचिता कुलकर्णी, केतकी पालव, स्नेहा चव्हाण, अपूर्व रांझणकर या कलाकारांना घेऊन सुरु झालेलया या वाहिनीने ‘बन मस्का’ , ‘फ्रेशर्स’ , ‘इथेच टाका तंबू’ , ‘श्रावण बाळ रॉकस्टार’, ‘युवागिरी’ आणि ‘लव्ह लग्न लोचा’ सारख्या फ्रेश मालिकानी यशाची अनेक शिखरे सर केली . सध्या नव्या जोमाने ‘फुलपाखरू’ , ‘अंजली’ , ‘गर्ल्स हॉस्टेल’ , ‘जिंदगी नॉट आउट’ आणि ‘रुद्रम’ या नवीन आणि कलाकृतीने संपूर्ण असलेल्या मालिकांनी,  झी युवाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला .नव्या मालिकेतील नवीन युवा कलाकार हर्षद अतकारी , सुरुची अडारकर , पियुष रानडे , ऋता दुर्गुळे , यशोमान आपटे , तेजस बर्वे , ज्ञानदा रामतीर्थकर , श्रीकर पित्रे , दीपश्री अमेय , वैष्णवी प्रशांत , अमृता फडके , प्राजक्ता वाडये , सुषमा कोले , रचना मिस्त्री , मुग्धा परांजपे , अश्विनी पाठक काळे , वंदना गुप्ते , सतीश राजवाडे , मोहन आगाशे , संदीप पाठक , किरण करमरकर , मिताली जगताप , सुहास पळशीकर विवेक लागू , सुहास सिरसाट , सई रानडे , अनिरुद्ध जोशी , मिलिंद फाटक , सुनील अभ्यंकर , आनंद अलकुंटे , किरण खोजे , आशिष कुलकर्णी आणि मुक्ता बर्वे अशी कलाकारांची मोठी फळी या मालिकेद्वारे वहिनीला जोडली गेली. आणि झी युवा चे कुटुंब आणखी मोठे झाले. वर्षपूर्तीचा हा आनंद साजरा करण्यासाठी झी युवाने एका जंगी पार्टी चे आयोजन केले होते , या पार्टी मध्ये ‘झी युवा’ वाहिनीवरच्या वेगवेगळ्या मालिकांमधल्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळाली. मालिकांमधल्या सर्वच कलाकारांनी ह्या पार्टीत धमाल उडवून दिली.