नांदेडः चिकली येथे ५८ वर्षांपासून 'एक गाव, एक गणपती'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

शिवणी (नांदेड): किनवट तालुक्यातील शिवणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकली येथे गेल्या ५८ वर्षांपासून 'एक गाव, एक गणपती' परंपरा गावकरी आजही राबवितात. पर्यावरणपूरक लाकडापासून बनविलेली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

चिकली येथील ग्रामस्थांनी १९५९ मध्ये गणेशोत्सवाला सुरवात केली. त्या वेळी आंध्रप्रदेशचे निर्मल येथील रहिवासी असलेले गुडप्पा नावाचे गणेश मूर्तिकार यांनी एका झाडाच्या तुकड्यापासून कोरीव काम करून मूर्ती तयार केली. १९५९ साली पोषट्टी कईवाड व विठ्ठल सरीवाड यांनी सुरवातीला या गणपतीची हीच परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जशीच्या तशी जपली आहे.

गावात गणेश मंडळाकडून अकरा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष करून या गणेश मंडळांकडून दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी करून रुग्णांना मोफत चष्मे वाटप केली जातात आणि भजन, कीर्तनाचे सुद्धा आयोजन केले जाते. शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा गणेश मंडळाकडून केला जातो, असे मंडळाचे अध्यक्ष सरील झरीवाड यांनी सांगितले.