बीड जिल्हा बॅंक प्रकरणी 16 आरोपींना पाच वर्षांची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

बीड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील बेकायदा कर्ज वाटप प्रकरणात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांतील पहिल्या प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. या प्रकरणातील 16 आरोपींना न्यायालयाने पाच वर्षांची साधी कैद व प्रत्येकी 60 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. 

बीड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील बेकायदा कर्ज वाटप प्रकरणात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांतील पहिल्या प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. या प्रकरणातील 16 आरोपींना न्यायालयाने पाच वर्षांची साधी कैद व प्रत्येकी 60 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. 

घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया प्रक्रिया संस्थेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 2009 मध्ये दोन कोटी 75 लाखांचे कर्ज दिले होते. कर्ज देताना नियमांना बगल दिली, कागदपत्रांची पूर्तता केली नाही, बॅंकेच्या हिताला बाधा आणल्याचा ठपका लेखा परीक्षणात ठेवण्यात आला होता. यानुसार बॅंकेच्या तत्कालीन अध्यक्षासह आठ संचालक आणि तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. 

याची सुनावणी अंबाजोगाईचे मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही. एम. सुंदाळे यांच्यासमोर झाली. 
जिल्हा बॅंकेतील कर्जवाटपाची प्रक्रिया, त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे अनेक अधिकारी व संचालकांची साक्ष या खटल्यात नोंदविण्यात आली होती. न्यायालयाने आज 16 आरोपींना दोषी धरत पाच वर्षे साधी कैद आणि प्रत्येकी 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्यांमध्ये जिल्हा बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुलकर्णी, रामराव आघाव, रामकृष्ण मानाजी कांदे, विठ्ठल गोविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे, शरद घायाळ, नागेश हन्नुरकर, विनायक सानप, शिवाजी खाडे, मंगला ऊर्फ प्रेरणा मोरे, लता सानप, विजयकुमार गंडले, जनार्दन डोळे, रंगनाथ देसाई, सुनील मसवले यांचा समावेश आहे. या प्रकरणातील बहुतांश आरोपी भाजपच्या दुसऱ्या फळीतील प्रमुख नेते आहेत.

Web Title: 16 accused sentenced to five years