तुळजापूरच्या यात्रेत अडीच लाख भाविक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

तुळजापूर - चैत्री यात्रेनिमित्त मंगळवारी तुळजाभवानी मातेचे सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले. शहरात "आई राजा उदो उदो'चा जयघोष सुरू होता. शहारातील भाविकांच्या अनेक काठ्या पालखी शहरात दाखल झाल्या होत्या.

यात्रेनिमित्त तुळजाभवानी मंदिराच्या गाभारा परिसरात प्रशासनाने दर्शनाची व्यवस्था केली होती. तथापि; मंदिरात अन्य ठिकाणी केलेले नियोजन अपयशी ठरले. त्यामुळे मंदिरात नगारखान्याजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास कोंडी झाली. नगारखान्याच्या पाठीमागून भाविकांना प्रवेश दिला जात होता. मात्र तेथेही कोंडी झाल्याने गोंधळी कट्ट्यापासून भाविकांना बाहेर काढण्यास सुरवात झाली. मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा त्रास भाविकांना सहन करावा लागत होता.