दौलताबादजवळ पकडला 35 लाखांचा गुटखा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

दौलताबाद - औरंगाबाद शहरात जात असलेला 35 लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासन, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. 27) पहाटे एकच्या सुमारास पकडून तीन वाहनांसह चार संशयितांना ताब्यात घेतले. 

दौलताबाद पोलिस ठाणे हद्दीत मुंबई महामार्गावरील साईश्रद्धा हॉटेलसमोर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या आदेशावरून पोलिस उपनिरीक्षक प्रशांत आव्हारे, सहायक फौजदार नंदकुमार भंडारी, हवालदार नंदू चव्हाण, शिवाजी झिने, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, विकास माताडे, लाला पठाण, धर्मराज गायकवाड, तुकाराम राठोड, योगेश गुप्ता, अफसर पठाण यांनी सापळा रचला.

एकच्या सुमारास पोटूळ फाट्याकडून येणारा टाटा एसी (एमएच-20-बीई-0886) व मालवाहू ऍपेरिक्षा (एमएच-21 एक्‍स-0893) थांबवून तपासणी केली असता, दोन्ही वाहनांत गुटखा असल्याचे टाटा एसीचा चालक शेख इब्राहीम शेख खुदबोद्दिन (वय 25, रा. अलमगीर कॉलनी, औरंगाबाद) याने सांगितले. ऍपेरिक्षातील शेख वसीम (वय 28, रा. औरंगाबाद), आमेर खान मोहंमद खान (वय 30, रा. कबाडीपुरा, औरंगाबाद), शेख नदीम शेख लाला (वय 28, रा. बुढीलाईन, औरंगाबाद) यांना विचारणा केली असता रिक्षा अन्वर, सिराज, फईम व सुरेश शेठ यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले. हा गुटखा पोटूळ फाट्याजवळील फार्म हाऊसवरून आणल्याचे आमेर खान मुहम्मद याने सांगितले. यानंतर पोलिसांनी पोटूळ येथील फार्म हाऊसवर छापा मारला असता तेथे महिंद्र पिकअप (एमएच-21 एक्‍स-7289) उभी आढळली. या वाहनातही गुटख्याच्या बॅगा भरलेल्या होत्या. पोलिसांनी तेथे काम करणारा शेख मेहमूद (वय 31, रा. लोटाकारंजा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने फार्म हाऊसवरील गुटखा व तीनही वाहने मुद्देमालासह दौलताबाद पोलिस ठाण्यात जमा केले. चारही संशयित आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय मंट्टे तपास करीत आहेत.