नांदेड जिल्ह्यातून हजला जाणाऱ्या ५०० भाविकांनी घेतले प्रशिक्षण

nanded
nanded

नांदेड - जिल्ह्यातून खाजगी टुर्स आणि हज कमिटीमार्फत हजला जाणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. हैदरबाग रोडवरील डिलक्स फंक्शन हॉलमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले असून, त्यात मौलाना साद अब्दुल्लाह नादवी, मोहम्मद शौकत आणि मोहम्मद शकील यांनी मार्गदर्शन केले.

पवित्र मक्का-मदिना शरीफ येथे हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना हज काळात करायचे धार्मिक विधी, जप आदींबाबत शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले. मुस्लिम धर्मामध्ये रोजे ठेवणे, पाच वेळा नमाज पडणे, जकात देणे (दानधर्म) आणि आयुष्यात कधीही एकदा तरी हज यात्रा करणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी मुस्लिम भाविक हजची यात्रा करतात. यावर्षी नांदेड जिल्ह्यातून ५०० भाविक सात ते १० ऑगस्ट या कालावधीमध्ये हजला जाणार आहेत. त्यात हज कमिटीतर्फे ३०० तर खासगी टुर्सतर्फे २०० भाविकांचा समावेश असणार आहे.

पूर्वी मराठवाड्यातील भाविक औरंगाबादहून विमानाने हजला जात होते. परंतु,  यावर्षीपासून हज यात्रा महाग झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून जाणाऱ्या ‘ग्रीन’ कॅटेगरीच्या भाविकांना दोन लाख ७१ हजार तर ‘अजीजिया’ यासाठी दोन लाख ३६ हजार ८०० रुपये खर्च येणार आहे. त्या तुलनेत मुंबई येथून गेल्यास ‘ग्रीन’ कॅटेगरीसाठी दोन लाख ४८ हजार तर ‘अजीजिया’साठी दोन लाख १४ हजारांचा खर्च येणार आहे. त्यामुळे एका भाविकाला मुंबईहून गेल्यास औरंगाबादच्या तुलनेत २२ हजार ८०० रुपये खर्च कमी येणार आहे. त्यामुळे नांदेडमधील भाविकांनी मुंबई येथूनच जाणे पसंत केले आहे.

भाविकांची मुंबईला पसंती
मागील वर्षीच्या तुलनेत हज यात्रेला जाण्यासाठी २० हजार रुपयांपेक्षा
जास्तीची वाढ झालेली आहे. मुंबई येथून गेल्यास औरंगाबादच्या तुलनेत २२
हजार ८०० रुपये कमी खर्च येणार असल्यामुळे मराठवाड्यातील दोन हजार ६५०
भाविकांना मुंबई विमानतळास पहिली पसंती दिली आहे. राज्यभरातून
आतापर्यंतच्या नोंदणीनुसार १२ हजारावर भाविक हजला जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com