मराठवाड्यात महसुलाची 529 कोटींची वसुली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात महसूल विभागाला 508 कोटी 95 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पार करीत विभागाने 529 कोटी 52 लाखांच्या करांची वसुली केली आहे. सलग दुसऱ्या वर्षी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले; तरीही गौण खनिज आणि करमणूक करवसुलीस फटका बसला.

औरंगाबाद - मराठवाड्यात महसूल विभागाला 508 कोटी 95 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पार करीत विभागाने 529 कोटी 52 लाखांच्या करांची वसुली केली आहे. सलग दुसऱ्या वर्षी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले; तरीही गौण खनिज आणि करमणूक करवसुलीस फटका बसला.

राज्य शासनाने 2016-17 या आर्थिक वर्षासाठी औरंगाबाद विभागाला महसूल कराची वसुली करण्यासाठी 508 कोटी 95 लाखांचे उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टांमध्ये जमीन महसूल मधून 122 कोटी 66 लाख, करमणूक कराची 50 कोटी 35 लाख आमि गौण खनिजाचे 336 कोटी कर वसूल करण्याचा समावेश करण्यात आला होता. 31 मार्चअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले.

सर्वाधिक उस्मानाबाद जिल्ह्यात 56 कोटी 20 लाखांची वसुली केली असून त्यापाठोपाठ बीड जिल्ह्याने 77 कोटी 88 लाख रुपये वसूल केले. हिंगोली जिल्ह्याला मात्र उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नसून 27 कोटी 83 लाखांपैकी 24 कोटी 3 लाखांची वसुली केली आहे. परभणी आणि नांदेड जिल्ह्यांनीही उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

जमीन महसूल कर वसुलीचे 122 कोटी 60 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बीड, औरंगाबाद, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली केली; तर जालना, परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची वसुली कमी झाली आहे. करमणूक कराच्या वसुलीचे उद्दिष्ट 50 कोटी 35 लाख इतके देण्यात आले होते. त्यापैकी 43 कोटी 96 लाख वसूल झाले आहे. हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांना देण्यात आलेले करमणुक कराचे उद्दिष्ट पूर्ण झाले. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर या पाच जिल्ह्यांना करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही.

गौण खनिजाचे 336 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र वाळूपट्टे लिलावात न गेल्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यास फटका बसला आहे. दगडखाणी, मुरूम आणि वाळूपटट्यांच्या लिलावातून सर्वाधिक उत्पन्न मिळत असले, तरी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मराठवाड्यात महसुलाची वसुली
जिल्हे......................उदिष्ट...................वसुली (सर्व रक्कम कोटीत)

औरंगाबाद................117.81....................118.00
जालना....................41.47....................43.41
परभणी....................50.59.....................47.86
हिंगोली.....................27.83...................24.03
नांदेड.......................108.49..................106.35
बीड.........................64.09....................77.55
लातूर........................55.35.....................56.09
धाराशिव.....................43.27......................56.20
एकूण.........................508.95....................529.52

Web Title: 529 carore revenue recovery in marathawada