मराठवाड्यातील 65 पोलिसांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

औरंगाबाद - पोलिस दलात पंधरा वर्षांपासून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या 65 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रदिनी, मंगळवारी (ता. एक) पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे. 

राज्य पोलिस दलात उत्तम कामगिरीबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येते. यंदा राज्यातील 571 जणांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पोलिस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. 

औरंगाबाद - पोलिस दलात पंधरा वर्षांपासून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या 65 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रदिनी, मंगळवारी (ता. एक) पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे. 

राज्य पोलिस दलात उत्तम कामगिरीबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येते. यंदा राज्यातील 571 जणांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पोलिस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. 

सन्मानचिन्ह जाहीर झालेले अधिकारी, कर्मचारी 
औरंगाबाद - पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग (ग्रामीण), सहायक पोलिस उपनिरीक्षक अक्रमखान यासीनखान व गोरखनाथ चव्हाण, उपनिरीक्षक कृष्णा हिस्वणकर (बिनतारी संदेश रा. रा. पो. बल गट 14), पोलिस हवालदारांमध्ये भीमराव खंडागळे, नारायण काकडे (गुप्तवार्ता), प्रकाश काळे, भीमराव चांदणे, विश्‍वनाथ आहेर, राजेंद्र वैद्य, कौशल्या रांजणे, संजय चोबे (गुन्हे अन्वेषण), बबन गायकवाड, विठ्ठल राख, सुनील शिराळे (ग्रामीण), शेख मसीउद्दीन सरफोद्दीन (पोलिस नाईक), शिपायांमध्ये सुनील फेपाळे, राजेंद्र सिनकर, नवाजोद्दीन नफीसोद्दीन पठाण, विजयकुमार नागरे (गुप्तवार्ता), दशरथ केंद्रे. 

जालना - पोलिस उपअधीक्षक सोपान बांगर, उपनिरीक्षक शेख नजीर शेख नसीर, 
पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या राखीव पोलिस उपनिरीक्षकांमध्ये सतीश मुत्याल, गोरख खंडाळकर,  रामराव राठोड (सहायक), हवालदारांमध्ये अब्दुल शकूर अब्दुल अजीज मोमीन, कैलास कुरेवाड. 

उस्मानाबाद - उपअधीक्षक मोतीचंद राठोड, सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये उत्तम जाधव, माया दामोदरे. हवालदारांमध्ये अनिल टोंगळे, राजेश गायकवाड. 

बीड - पोलिस उपनिरीक्षक दिनेश आहेर, हवालदारांमध्ये अभिमन्यू औताडे, परमेश्‍वर सानप, 
मुकुंद तांदळे, पोलिस नाईक बाबासाहेब करांडे. 

नांदेड - पोलिस निरीक्षक भगवान कापकर, उपनिरीक्षक अनिलकुमार आदोडे, संभाजी होनराव (सहायक), शेख हैदर महंमद इस्माईल (चालक हवालदार) 

हिंगोली - पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, विशाल कदम (सशस्त्र सहायक उपनिरीक्षक, रा. रा. पो. बल गट 12), हवालदार शेख उमर शेख मन्नान, एसीबीचे आनंदराव मस्के. 

परभणी - पोलिस उपनिरीक्षक महादू मालसमिंदर, प्रकाश कुकडे, शेख उस्मान चॉंद (सहायक), हवालदारांमध्ये मकसूद अहमदखॉं पठाण, सय्यद इब्राहिम, संजय वळसे, चंद्रशेखर बाविस्कर, राजेश जाधव, शेख मुजीब शेख सादेक, नरेश सिरसकर, संभाजी ताल्डे (पोलिस नाईक, नागरी हक्क संरक्षण) 

लातूर - पोलिस उपनिरीक्षक अशोक गायकवाड, गंगाधर टेकाळे (सहायक), हवालदारांमध्ये संजीवकुमार भिकाने, अनिल वीरकर (पोलिस प्रशिक्षण केंद्र), चिमाजी बाबर (पोलिस प्रशिक्षण केंद्र), अविनाश गाडेकर, प्रवीण सूर्यवंशी, पोलिस नाईक राजेंद्र टेकाळे. 

Web Title: 65 police of Marathwada are honored with the DGP Honor