सात लाख पुस्तकांची महापालिकेने केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

औरंगाबाद - महापालिकेने शहरातील ४६९ प्राथमिक शाळांसाठी यंदा सात लाख ७७ हजार ४७६ पाठ्यपुस्तकांची मागणी शासनाकडे केली असून, त्यातील ५८ टक्के पुस्तके शुक्रवारपर्यंत (ता. २५) प्राप्त झाली आहेत. एक ते दहा जूनदरम्यान संबंधित शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. 

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. 

वर्ष २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात महापालिकेने शहरातील ४६९ शाळांसाठी एक लाख ४२ हजार १३ अशी विद्यार्थी संख्या गृहित धरून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी सात लाख ७७ हजार ४७६ पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. शुक्रवारपर्यंत ५८ टक्के म्हणजे चार लाख ५३ हजार ६९९ पुस्तके महापालिकेला प्राप्त झाली आहेत. 

उस्मानपुरा येथील महापालिकेच्या शाळेतील गोदामात पुस्तके ठेवण्यात आली आहेत. उर्वरित तीन लाख २३ हजार ७७७ पुस्तके ३१ मेपर्यंत येणार आहेत. त्यानंतर दहा जूनपर्यंत पुस्तकांचे वाटप शाळांना करण्यात येणार आहे. 

चोवीस तास सुरक्षारक्षक 
गतवर्षी पुस्तकांची चोरी झाली होती. त्यामुळे यंदा २४ तास सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहे. रात्री पोलिसांचीही पेट्रोलिंग येथे सुरू करण्यात आली आहे. अग्निशमन यंत्रणाही बसविण्यात आली आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

शाळा व पुस्तकांची मागणी
माध्यम    एकूण शाळा    एकूण विद्यार्थी    पुस्तक मागणी

मराठी          ३२९              ९६,३५१              ५,१२,२८०
उर्दू              १३०              ४२,१२७              २,४६,८९४
हिंदी            ०५                   ६९५                  ३,४९५
इंग्रजी         ०५                  २,८४०                 १४,८०७
एकूण          ४६९            १,४२,०१३              ७,७७,४७६

Web Title: 7 lakh book demand by municipal