पेठसांगवी नाल्यात होणार ७५ लाख लिटर पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

उमरगा - ‘सकाळ’ रिलीफ फंडाच्या माध्यमातून व तनिष्का गटाच्या पुढाकारातून तालुक्‍यातील पेठसांगवी येथे सुरू असलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम बारा दिवसांत पूर्ण करण्यात आले. या कामामुळे शेत शिवारातील व गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीची पाणीपातळी वाढणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या कामामुळे सुमारे ७५ लाख लिटर पाणीसाठा होणार असल्याने शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे.

उमरगा - ‘सकाळ’ रिलीफ फंडाच्या माध्यमातून व तनिष्का गटाच्या पुढाकारातून तालुक्‍यातील पेठसांगवी येथे सुरू असलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम बारा दिवसांत पूर्ण करण्यात आले. या कामामुळे शेत शिवारातील व गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीची पाणीपातळी वाढणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या कामामुळे सुमारे ७५ लाख लिटर पाणीसाठा होणार असल्याने शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे.

तालुक्‍यातील पेठसांगवी परिसर रेड झोनमध्ये येते. पाणी पातळी खालावल्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणीप्रश्‍नाला सामोरे जावे लागत आहे. पाणीप्रश्‍नावर कायमची मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते. ही बाब गावातील तनिष्कांच्या लक्षात आली. त्यांनी ‘सकाळ’ रिलीफ फंडातून गावामध्ये नाला खोलीकरणाची कामे करण्यासाठी निधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सकाळ रिलीफ फंडातून या कामासाठी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर पाच मे रोजी खोलीकरणाच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. हे काम मंगळवारी (ता.१६) पूर्ण करण्यात आले. बारा दिवसांत नाला सरळीकरण व खोलीकरणाचे जवळपास सव्वाकिलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.

भूकंपामुळे जुन्या गावाचे पुनर्वसन झाले आहे. या गावालगतचा नाला बुजलेल्या स्थितीत होता. त्याचे पुनर्जीवन करण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे. या नाल्यालगत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विंधन विहिरी आहेत, नाल्यात पाणी साठल्यानंतर विंधन विहिरीला पाणी उपल्बध होणार असून पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. पेठसांगवीचे शेतशिवार माळरानासारखे असून, या कामामुळे शेतीला आता पाणी मिळणार आहे. या कामामुळे जवळपास ७५ लाख लिटर पाणीसाठा निर्माण होणार आहे.

सामाजिक कामांसाठी तनिष्का ग्रुप सक्रिय आहे.‘सकाळ माध्यम समूहा’ने तनिष्का व्यासपीठ निर्माण करून आम्हाला सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित केले. सकाळ रिलीफ फंडातून उपलब्ध निधीमुळे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम पूर्ण झाले. आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.
- रूपाली प्रकाश सुभेदार, गटप्रमुख, तनिष्का व्यासपीठ

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017