गायकवाड मारहाणप्रकरणी आठ जणांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह आठ जणांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अमित भुईगळ यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला

औरंगाबाद - राज्याचे महिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमित भुईगळसह आठ जणांना शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. पाडळकर यांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सशर्त जामीन मंजूर केला.

माहिती आयुक्त गायकवाड हे 17 एप्रिलला शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी सुभेदारी विश्रामगृहात भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह आठ जणांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अमित भुईगळ यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. हे आठही जण न्यायालयीन कोठडीत असून, त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.