राज्यातील नऊशे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मंत्री पंकजा मुंडेंच्या निर्णयाचा शिक्षकांना फायदा 
बीड - राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या नऊशे प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याचा निर्णय नुकताच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला होता. त्याचा शिक्षकांना फायदा झाला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने मध्यावधी बदल्या थांबविल्या होत्या. अनेक जिल्हा परिषदांकडून चुकीची कार्यपद्धती अनुसरून आंतरजिल्हा बदलीसाठी "ना हरकत प्रमाणपत्रे' दिली जात होती. त्यामुळे शासनाने डिसेंबर 2016 नंतर कोणत्याही शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र न देण्याबाबत आदेश दिले होते. शासन स्तरावरून आता आंतरजिल्हा बदलीबाबत नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्याबाबतचा आदेश निर्गमित होणार आहे. दरम्यान, ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून दोन्ही जिल्हा परिषदांनी 31 डिसेंबर 2016 पूर्वी "ना हरकत' प्रमाणपत्र दिले आहे, अशाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून कार्यमुक्तीचे आदेश 15 एप्रिलपूर्वी काढण्यात यावेत, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये हजर होणाऱ्या शिक्षकांचे आदेश तयार करून संबंधित शिक्षकास कार्यमुक्त करणाऱ्या जिल्हा परिषदेला कालमर्यादेत पाठविण्याची कार्यवाही करावी, आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यमुक्त करणाऱ्या जिल्हा परिषदांनी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश 20 एप्रिल 2017 पर्यंत काढावेत असे आदेश दिले आहेत. या आदेशात प्रत्यक्षात कार्यमुक्तीची मुदत आठ मे 2017 असणार आहे. याचा फायदा नऊशे शिक्षकांना झाला आहे.

Web Title: 900 teacher inter district transfer permission