‘आसिफा, तू जिंदा है’द्वारे अत्याचारविरोधात आवाज

‘आसिफा, तू जिंदा है’ पथनाट्यात सहभागी कलावंत.
‘आसिफा, तू जिंदा है’ पथनाट्यात सहभागी कलावंत.

औरंगाबाद - भारतीय महिला फेडरेशन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष खोकडपुरा शाखेतर्फे ‘आसिफा, तू जिंदा है’ हे पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. गांधीनगर, बापूनगर, खोकडपुरा परिसरात गुरुवारी (ता. २६) आणि शुक्रवारी (ता. २७) देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  प्रा. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित या पथनाट्यातून लहानग्यांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविला. या वेळी भाकप खोकडपुरा शाखेच्या सहसचिव अनिता हिवराळे, जिल्हा सहसचिव अभय टाकसाळ उपस्थित होते. 

गांधीनगर लाल मशिद, बापूनगर विहार, खोकडपुरा हनुमान मंदिर, सब्जी मंडी मशिदीजवळ हे पथनाट्य सादर करण्यात आले. आपल्या जिवंत अभिनयाने या विद्यार्थ्यांनी बघणाऱ्या लोकांना हेलावून टाकले. त्या निरागस चिमुरडीवरील अत्याचार पाहून तर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

या पथनाट्यात यशपाल गुमलाडू, विक्रम त्रिभुवन, प्राजक्ता ख्रिस्ते, प्रियंका सदावर्ते, परमेश्वर कोकाटे, ऊर्मिला सपकाळ, अभिजित काळे, जगदीश गोल्हार, अविनाश वाघमारे, अनिल राठोड, ऋषिकेश आव्हाड, अस्मिता भारती, सद्दाम शेख, नारायण त्यारे, अभिजित पाटील, रवी बारवाल, शाहरुख लखानी, पूजा देशमुख, प्रकाश बांगर, मंगेश तुसे यांनी ताकदीचा अभिनय केला.

कार्यक्रमासाठी राजू हिवराळे, अनिता हिवराळे, ॲड. अय्यास शेख, विकास गायकवाड, क्रांतीश्वर बनकर, जयश्री शिर्के, अक्षता शिर्के, शेरखान, शबाना बेगम, मानसी बाहेती, सय्यद मुख्तार अहमद, शेख जफर शेख अफसर, पुष्पाताई बिरारे, मनीषा भोळे, शेख जफर शेख अफसर, पुष्पाताई बिरारे, चंदाबाई आराक, कविता होर्शिल यांनी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com