भाजप महामेळाव्यास मराठवाड्यातून सव्वा लाख कार्यकर्ते जाणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे मुंबईला सहा एप्रिल रोजी होणाऱ्या महामेळाव्यास मराठवाड्यातून सव्वा लाख कार्यकर्ते जाणार आहे. यासाठी 11 विशेष रेल्वे व 35 बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रवक्‍ते शिरिष बोराळकर यांनी मंगळवारी(ता. 3) पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुंबई येथील वांद्रे (पुर्व) बीकेसी मैदानावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महामेळावा घेण्यात येणार आहे. शिवसेनच्या दसरा मेळाव्या प्रमाणे एक शक्‍तीप्रदर्शन करण्यासाठी हा महामेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी गेल्या महिनभरापासून राज्यभरात नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यातून 14 हजार 809 बुथ असून यापैकी 13 हजार 630 बुथ व्हेरिकेशन झाले आहे. यातील प्रत्येक बुथ वरून किमान दहा कार्यकर्ते येणार आहेत. एका बुथ वरून दहा कायकर्ते मेळाव्यासाठी मुंबईला जाणार आहे. याच्या माध्यमातून भाजपचे संगठन मजबूत करणाऱ्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही श्री. बोराळकर यांनी सांगितले. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, कचरु घोडके, राम बुधवंत उपस्थित होते.

Web Title: About one lakh workers from Marathwada will go to BJPs rally